मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना एनसीबीमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली नाहीये. त्यांची बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना त्यांच्या पूर्व विभागात म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालय (Directorate of Revenue Intelligence) मध्ये त्यांची पोस्टिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (NCB officer Sameer Wankhede transferred and posting to DRI)
समीर वानखडे (Sameer Wankhede) यांनी DRI मध्ये पोस्टिंग दाखवणयात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, वानखडे यांनी अद्याप पदभार सोडलेला नाहीये. सध्या ते गोवा येथे एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी वानखडे यांना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजपचा एक बडा नेता प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा -
समीर वानखडे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये NCB चा पदभार स्विकारला होता. ते अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्ज तस्करी प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर चर्चेत आले होते. समीर वानखडे यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्येच संपला होता. मात्र त्यांना चार महिने मुदतवाढ मिळाली होती.
कार्डेलिया क्रूझ प्रकरणातील पंचाच्या आरोपानंतर वानखडे यांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणी समीर वानखडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयातही धाव घेतली असून हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठेत आहे.
Edited By - Nuour Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.