Crime News Twitter
मुंबई/पुणे

महिलांच्या कपड्यात लपवले ४ किलो ड्रग्ज, समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी

एनसीबीने महिलांच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवलेले किमान ४ किलो Ephedrine जप्त केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - अंमली पदार्थांविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (NCB) कारवाई सुरूच आहे. शुक्रवारी (21 जानेवारी) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने 4 किलो Ephedrine जप्त केले आहे. एनसीबीने महाराष्ट्रातील धारावीमध्ये ही कारवाई केली आहे. अंमली पदार्थ महिलांच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते अशी माहिती देण्यात येत आहे. एनसीबीच्या मुंबई (Mumbai) युनिटने अंधेरी (पूर्व) येथे छापा टाकून अंमली पदार्थांची ही खेप जप्त केली. हे अंमली पदार्थ पुण्यातून आल्याचे सांगण्यात येत आहे.

एनसीबीने महिलांच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवलेले 4 किलो Ephedrine जप्त केले आहे. ड्रग्जची ही खेप समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

मुंबई एनसीबीची गोव्यात छापेमारी

या महिन्याच्या सुरुवातीला समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या पथकाने गोव्यात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यात दोन महिला ड्रग्ज पुरवठादारांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या महिलांमध्ये एक महिला विदेशी असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीच्या पथकाने या दोन महिला ड्रग्ज पुरवठादारांकडून 1 किलो गांजा, 49 ड्रग गोळ्या, 2.2 ग्रॅम कोकेन, 1 ग्रॅम एमडीएमए पावडर जप्त केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT