Nawab Malik News Saam tv
मुंबई/पुणे

Nawab Malik News: नवाब मलिक तब्बल दीड वर्षभरानंतर तुरुंगाबाहेर; कुटुंबीयांसह समर्थकांचा जल्लोष

Nawab Malik News: मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक तब्बल दीड वर्षभरानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत .

Vishal Gangurde

Nawab Malik News: मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक तब्बल दीड वर्षभरानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत . मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करत मोठा दिलासा आहे. त्यानंतर आज माजी मंत्री नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले आहेत. यावेळी त्यांच्या कुटुंबीयासह समर्थकांनी एकच जल्लोष केला. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणातून तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. कोर्टाने त्यांच्या प्रकृतीचा विचार करून दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकार आणि त्याच्या इतर हस्तकाशी ३०० कोटी मालमत्तेच गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर व हस्तकाशी सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

दरम्यान, नवाब मलिक हे सध्या सीटी केअर रुग्णालयात किडनीच्या आजारावर उपचार घेत आहरेत. प्रकृती ढासळल्यानंतर मलिक यांनी जामिनीसाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र त्यावेळी ईडीने विरोध केला होता. त्यानंतर पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल केला, त्यावेळी ईडीने विरोध केला नाही. त्यानंतर कोर्टाने जामीन मंजूर केला.

नवाब मलिकांना केव्हा अटक झाली?

महाविकास आघाडीचे सरकार असताना फेब्रूवारी २०२२ मध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. मलिकांना दीड वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या बडानंतर मलिक यांच्या सुटकेच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT