Modak Maharaj Passed Away Saam TV
मुंबई/पुणे

Modak Maharaj : मोडक महाराज यांचे कार अपघातात निधन; अनुयायांमध्ये शोककळा

नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराज यांचं अपघाती निधन झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Modak Maharaj Passed Away : एक दु:खद बातमी समोर येत आहे. मुंबईसह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराज यांचं अपघाती निधन झालं आहे. पुणे-सातारा महामार्गावर कार अपघातात त्यांचं निधन झालंय. सततच्या प्रवासामुळे चालकाला झोप अनावर झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Latest Marathi News)

कल्याण मठात शेजारती झाल्यानंतर येथून ते काल (ता.१८) रात्री उशिरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी निघाले होते. त्यापूर्वी ते काशी येथून कल्याण येथे आले होते. पुणे-सातारा रस्त्यावर त्यांची गाडी दुभाजकाला धडकून अपघात झाला. महाराजांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात ठेवले जाणार आहे.

दरम्यान, मोडक महाराज यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच राज्यभरातील भक्तगण कल्याणच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मोडक महाराज यांनी श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना केली होती. त्यांचे राज्यभरात अनुयायी सुद्धा आहेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT