Navneet Rana's first reaction after the photo of Raut having dinner with Rana went viral
Navneet Rana's first reaction after the photo of Raut having dinner with Rana went viral Saam Tv
मुंबई/पुणे

रवी राणांसोबत राऊतांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवणारे राणा दाम्पत्य हे लेह-लडाख दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील लेह-लडाख दौऱ्यावर होते. यात आमदार रवी राणा आणि संजय राऊत यांचे एकत्र जेवतानाचे फोटो व्हायरल (Viral Photos) झाले. राणा दाम्पत्य (Navneet Rana) आणि राऊत एकमेकांसोबत गप्पा मारतानाही दिसून आल्याने संपूर्ण राज्यात एकच कुचबुज सुरु झाली. याबाबत टीका होऊ लागल्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Navneet Rana's first reaction after the photo of Raut having dinner with Rana went viral)

हे देखील पाहा -

खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, मला वाटतं जसं आमच्या कमिटीत ज्याप्रमाणे अनेक खासदार असतात त्याप्रमाणे राऊतसुद्धा खासदार आहेत. जर त्यांना बघून मी माझा दौरा रद्द केला तर मी माझ्या प्रोफशनलिझमवर मोठ अन्याय करेल. आमच्या कमिटीसह अभ्यास करणं महत्वाचं आहे. महाराष्ट्राची संस्कती आहे की, बाहेर गेलं तर शत्रूसोबतही वाईट वागता कामा नये.

पुढे त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही शत्रूता करतोय. आमच्यावर अत्याचार झाले. त्यांच्या सरकारने आम्हाला १४ दिवस तुरुंगात ठेवलं. तरीही आम्ही त्यांच्यासोबत चांगलं वागलो हा आमचा मोठेपणा आहे. त्यांच्या (राऊतांच्या) वयाची मर्यादा लक्षात घेत आम्ही त्यांच्यासोबत चांगलं वर्तन केलं. मी विकासासाठी लढाई केली आहे. आम्ही आधीही भ्रष्टाचाराविरोधोत होतो, आताही आहोत आणि नेहमी राहिल असं त्या म्हणाल्या आहेत.

राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लेह-लडाख दौऱ्यावर का गेले होते?

संसदीय समितीच्या संरक्षण समितीचे सदस्य तीन दिवसीय लडाख दौऱ्यावर होते. या दौऱ्यात एकूण ३० खासदार होते. यात खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा यांचा समावेश आहे. खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घेण्याची परवानगी आहे आणि त्यामुळेच नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे लडाख दौऱ्यात सुद्धा उपस्थित आहेत. आमदार रवी राणा आणि संजय राऊत हे एकमेकांसोबत जेवण करतानाही दिसून आले आहे. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिघांरही टीका होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SRH Qualify For Playoffs: हैदराबादची झाली 'चांदी'; एकही चेंडू न खेळता मिळालं प्लेऑफचं तिकीट

Maharashtra Politics 2024 : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर; शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा

SCROLL FOR NEXT