मुंबई/पुणे

रुग्णालयात दाखल नवनीत राणांचा जेल प्रशासनावर खळबळजनक आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची तब्बल बारा दिवसानंतर कारागृहातून सुटका झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्यांची आज कारागृहातून सुटका झाली आहे. त्यांची तब्येत खालावली असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरुन आता नवनीत राणा यांनी जेल प्रशासनावर आरोप केले आहेत.

'खासदार नवनीत राणा यांची तब्बेत अधिक खालावली आहे, डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. त्यांनी लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीकडे जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतरही उपचार मिळालेले नाहीत. तुरुंग प्रशासनाने त्यांच्यावर दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवनीत यांची तब्बेत अधिक बिघडली आहे. याविरोधात कोर्टात जाणार' असल्याचे नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या वकीलांनी म्हटले आहे.

नवनीत राणा यांना प्रकृतीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना जेलमधून बाहेर सोडताच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लीलावती रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

हनुमान चालीसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. बारा दिवसांपासून राणा दाम्पत्य कोठडीत होते. न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. अटी-शर्तींचे उल्लंघन झाले तर, जामीन रद्द होईल, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.

राणा दाम्पत्याला कोणत्या अटींवर मिळाला जामीन

  • राणा दाम्पत्य या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बाब माध्यमांसमोर येऊन सांगू शकत नाही.

  • पुराव्यांशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू शकत नाहीत.

  • ज्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती, त्या प्रकारचा कोणताही गुन्हा ते पुन्हा करू शकत नाहीत.

  • राणा दाम्पत्याला चौकशीत सहकार्य करावे लागेल.

  • तपास अधिकारी (IO) चौकशीसाठी बोलावतील, तेव्हा हजर व्हावे लागेल. त्यासाठी संबंधित तपास अधिकारी २४ तास आधीच नोटीस देतील.

  • जामिनासाठी प्रत्येकी ५० हजारांचा बॉण्ड भरावा लागेल.

  • हे देखील पाहा

काय आहे प्रकरण?

राज्यात लाउडस्पीकरवरून वाद सुरू होता. त्याचवेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा (Ravi Rana) हे मुंबईत आले होते. यावरून शिवसैनिकही आक्रमक झाले होते. त्यांनी मातोश्रीबाहेर कडा पहारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी राणा यांच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शने केली होती. तसेच पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले

Self Development Tips: स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःला लावा या '५' सवयी

Virat Kohli Viral Video: मन जिंकलस भावा! दिनेश कार्तिकडून ऑरेंज कॅप स्वीकारताच विराटने केलं असं काही- Video

SCROLL FOR NEXT