Navi Mumbai: महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे विकास मिरगणे
मुंबई/पुणे

Navi Mumbai: महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे

मनपा अधिकारी फक्त कागदी नोटिसा Notice बजावत शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत.

विकास मिरगणे

मुंबई - नवी मुंबई Navi Mumbai शहर हे विकसनशील शहर आहे. परंतु सध्या हे शहर अनाधिकृत बांधकामांचे unauthorized construction शहर म्हणून नावारूपास येत आहे. गेल्या काही वर्षांत नवी मुंबई शहरात अनाधिकृत बांधकामे हजारोंच्या पटीने वाढली असून मनपा अधिकारी फक्त कागदी नोटिसा Notice बजावत शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत. ऐरोली, घणसोली, रबाळे, तुर्भे, सानपाडा, वाशी, बेलापूर, नेरूळ अशा सर्वच ठिकाणी अनाधिकृत बांधकामे ही अधिकाऱ्यांना हाताशी उभी करण्यात आली आहेत.

हे देखील पहा -

या अनाधिकृत बांधकामांना थोपविण्यासाठी अतिक्रमण अधिकारी या पदावर अतिक्रमण घोटाळा केलेल्या दिसून येत आहे. सिडकोकडून अनधिकृत बांधकामांवर अकुंश ठेवण्यासाठी कठोर उपायोजना केल्या जात नाही. त्याचबरोबर महापालिकेने देखील भूमाफियांच्या विरोधात कंबर कसली नाही. त्यामुळे बिल्डर माफियांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले.

पालिकेच्या हद्दीतील जुहूगाव, घणसोली, नेरूळ, वाशी गाव, कोपरखैरणे, ऐरोली, दिघा गावठाण परिसरात, सिडको तसेच औद्योगिक विभागाच्या जागेवर बिनधास्तपणे अनधिकृत इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. यावरून सिडको अधिकारी महानगरपालिका आयुक्त हे बिल्डरच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast : 'दिल्ली स्फोट दहशतवादी हल्लाच'; केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय

लग्नमंडपात नवरदेवाला भोसकलं; ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला थरार

Sangli Tourism: सांगलीमध्ये लपलाय 'हा' भव्य किल्ला; जाणून घ्या ऐतिहासिक वारसा वैशिष्ट्यं

Maharashtra Live News Update: सीएसएमटी ते खोपोली जाणाऱ्या लोकलच्या पंख्यामधून अचानक निघू लागला धूर

Mumbai Crime : मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरी; ११ डबे घेऊन चोरांचा ‘लंच ब्रेक’? चोरट्याचा फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT