Viral Video saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Navi Mumbai Viral Video News : नवी मुंबईच्या तुर्भे येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गटाराच्या पाण्यात भाजीपाला धुवत असल्याचे दिसते.

Yash Shirke
  • नवी मुंबईत महिलेने गटाराच्या पाण्यात भाजी धुतल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

  • व्हिडीओमध्ये महिला भाज्या थेट रस्त्यावरच्या घाणेरड्या पाण्यात धुवून विक्रीसाठी ठेवताना दिसते.

  • या प्रकारामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.

विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Video : नवी मुंबईमधून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका भाजी विक्रेती महिला गटारामध्ये पडलेला भाजीपाला पुन्हा काढून तो विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार नवी मुंबईच्या तुर्भे भागामध्ये घडला आहे. व्हिडीओमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तुर्भे परिसरात रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या भाज्यांचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक महिला रस्त्याच्या कडेला ठेवलेली भाजी थेट गटाराच्या पाण्यात धूत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे घाणेरडा प्रकार समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये महिला गटाराच्या झाकणाच्या बाजूला भाजी धुवत असल्याचे पाहायला मिळते. रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्यात भाजीपाला धुतल्यानंतर महिला बाजूला ठेवलेली भाजी पाण्यात बुडवते. तीन ते चार वेळा ही महिला भाजी पाण्यात धुत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. नवी मुंबईतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी मुंबईच्या तुर्भे परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीखालील रस्त्यावर सदर घटना घडली आहे. रस्त्यावर विक्रीसाठी असलेल्या भाज्या महिला गटाराच्या पाण्यात धूत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. घाणेरड्या पाण्यात धुतलेली हीच भाजी पुन्हा सर्वसामान्यांना विकत असल्याचा आरोप केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lunar Eclipse : 3 मार्चला ग्रहणातच चंद्र उगवणार; भीती नव्हे तर विज्ञानाची किमया, तज्ज्ञांचा सल्ला

मॅच विनिंग ९७ धावा करताच संजूनं घेतलं विराट-रोहितचं नाव, शेवटच्या क्षणापर्यंत डोक्यात काय चाललं होतं?

मुंबईत मिळणार फायनलचे तिकिट; उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत? वाचा संपूर्ण वेळापत्रक

खामेनीची हत्या, पाकिस्तान पेटला, पाकमधील अमेरिकन दूतावासात अग्नितांडव

T20 World Cup: सॅमसनचा वेस्ट इंडीजवर एअरस्ट्राईक! करो या मरो युद्धात भारताचा धमाकेदार विजय, सेमीफाइनलमध्ये दणक्यात एन्ट्री

SCROLL FOR NEXT