Mumbai Sindhudurg Flight Start News  AI Image
मुंबई/पुणे

"महाराजा, विमान कायम चलतं रवान देत!" नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा पुन्हा सुरू; तिकिटाची किंमत किती?

Navi Mumbai Sindhudurg Chipi Flight News : दोन वर्षांपासून बंद असलेली मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. नवी मुंबई विमानतळावरून फ्लाय ९०च्या पहिल्या विमानाने चिपी विमानतळाच्या दिशेने उड्डाण केले.

Alisha Khedekar

  • मुंबई ते सिंधुदुर्गदरम्यान बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू

  • नवी मुंबई विमानतळावरून फ्लाय ९०च्या विमानाने चिपी विमानतळाच्या दिशेने उड्डाण

  • विमानप्रवासामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग अंतर कमी वेळेत पार करता येणार

  • मालवणी भाषेत देवाला गाऱ्हाणे घातले

विनायक वंझारे, सिंधुदुर्ग

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नवी मुंबई विमानतळावरून चिपी विमानतळाच्या दिशेने पहिल्या विमानाने उड्डाण केले. त्यामुळे आता मुंबईहून कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना तासनतास प्रवास करण्याची गरज भासणार नाही. अवघ्या एका तासात मुंबईहून सिंधुदुर्ग गाठता येणार असल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली ही विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पहिल्या उड्डाणासाठी फ्लाय ९० कंपनीचे विमान मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाले. विशेष म्हणजे ही विमानसेवा नियमितपणे सुरु राहणार असून विमानाचे तिकीट प्रवाशांना परवडणारं आहे. या पहिल्या विमानातून मंत्री नितेश राणे यांनीही प्रवास केला. तसेच आमदार दीपक केसरकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

या पहिल्या विमानप्रवासाला एक खास मालवणी रंगही पाहायला मिळाला. विमानाने उड्डाण केल्यानंतर प्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद धुरी यांनी मालवणी भाषेत देवाला गाऱ्हाणे घातले. ही विमानसेवा कायम सुरू राहावी, प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यांच्या या अनोख्या गाऱ्हाण्याला मंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनीही दाद दिली.

मुंबई ते सिंधुदुर्ग हा रस्ते किंवा रेल्वेने प्रवास करताना अनेकदा सहा ते आठ तास खर्च होतात. विशेषतः सण, उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात कोकण रेल्वेतील गर्दीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या विमानसेवेमुळे मुंबईत कामानिमित्त राहणाऱ्या कोकणवासीयांना गावाकडे जाणे सोपे होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Styling Tips For Women: महिलांसाठी साडी नेसण्याच्या हटके टिप्स! लग्नकार्य, ऑफिस आणि पार्टीसाठी ठरतील एकदम बेस्ट

Maharashtra News Live Update: आंबे विहीर दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन; प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार तपास

Political News: पुण्यात खलबतं! मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत बैठक, केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब?

Government Schemes : आधार कार्ड नाही? तरीही मिळणार सरकारी योजनांचे पैसे! फक्त हे एक कागदपत्र ठेवा जवळ

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 मोठे अपडेट! पगारवाढीबाबत आली महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT