Navi Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरली! मुलीला २९ व्या मजल्यावरून फेकलं, मग आईनेही घेतली उडी

Panvel Crime: नवी मुंबईच्या पनवेलमध्ये आईने आपल्या मुलीच्या हत्येनंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पनवेल पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Priya More

नवी मुंबईमध्ये आईने आपल्या पोटच्या मुलीला २९ व्या मजल्यावरून फेकून देत नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे. या महिलेने असं कृत्य का केलं यामागचे कारण अस्पष्ट आहे. पनवेल पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथील पळस्पे परिसरात असणाऱ्या मॅरेथॉन नेक्सन ओरा इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या ८ वर्षांच्या मुलीला बेडरूमच्या खिडकीतून फेकून दिले. त्यापाठोपाठ या महिलेने देखील २९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे पनवेल हादरले आहे.

मैथिली दुवा असं या महिलेचे नाव आहे. मैथिली आपल्या कुटुंबीयांसोबत मॅरेथॉन नेक्सन ओरा इमारतीतील २९ व्या मजल्यावर राहत होती. या महिलेची मानसिक स्थिती ठीक नव्हती असे सांगितले जात आहे. मैथिलीने आज सकाळी आपल्या ८ वर्षांच्या मुलीला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकून तिची हत्या केली. त्यानंतर तिने देखील उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT