Navi Mumbai School Girl News Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: शाळेच्या शौचालयात आढळला ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह; नवी मुंबईतील खळबळजनक घटना

Navi Mumbai School Girl News: सहावीत शिकणाऱ्या एका ११ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेच्या शौचालयात मृतदेह आढळून आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Navi Mumbai School Girl Death: नवी मुंबईच्या वाशी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहावीत शिकणाऱ्या एका ११ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेच्या शौचालयात मृतदेह आढळून आला आहे. वाशी येथील सेंट मेरी या इंग्रजी माध्यम शाळेत शनिवारी (१५ जुलै) दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुग्धा महेंद्र कदम (वय ११) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धा कोपरखैरणे (Navi Mumbai) परिसरातील रहिवाशी असून ती वाशी येथील सेंट मेरी या इंग्रजी माध्यम शाळेत सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी मुग्धा नेहमीप्रमाणे शाळेत गेली. मधल्या सुट्टी दरम्यान मुग्धा शौचालयात (School Toilet) गेली होती. मात्र, वर्ग पूर्ण भरल्यावरतीही ती परत आली नाही. त्यामुळे तिच्या वर्गमित्रांनी ही बाब शिक्षकांच्या लक्षात आणून दिली.

मुग्धा बेपत्ता झाल्याचं कळताच शाळेतील शिक्षकांनी तिची शोधाशोध सुरू केली. मात्र ती शाळेच्या परिसरात कुठेच सापडली नाही. याच शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेला शौचालयात साफ- सफाईसाठी गेलेल्या महिलेला एक दरवाजा बंद आढळून आला.

दरवाजावर थाप मारुनही आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा तिने तातडीने शाळेतील शिक्षकांना ही माहिती दिली. दरवाजा तोडल्यानंतर मुग्धा शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळली. तेव्हा तातडीने शाळा प्रशासनाला याबाबत माहिती दिली.

दरम्यान, बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुग्धाला तातडीने उपचारासाठी (Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुग्धाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाही.

त्यामुळे तिच्यासोबत गैरप्रकाराचा संशय नाही, असं पोलिसांनी सांगितलं. मुग्धाचे शवविच्छेदन केल्यानंतर तिला मधुमेहाचा त्रास होता, म्हणून तिचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथामिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT