Navi Mumbai CIDCO Homes Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

Navi Mumbai CIDCO Homes: म्हाडाप्रमाणे सिडको देखील घराच्या किंमती स्वस्त करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे या लॉटरीसाठी अर्ज करण्यांना चांगला फायदा होणार आहे.

Priya More

म्हाडापाठोपाठ आता सिडकोची घरं देखील स्वस्त होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सिडकोच्या घरांच्या किमती म्हाडाप्रमाणेच १० टक्क्यांनी कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईत सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. लवकरच नवी मुंबईतील सिडकोच्या ४० हजार घरांसाठी लॉटरी निघणार आहे.

म्हाडाप्रमाणे सिडको देखील घराच्या किंमती स्वस्त करण्याच्या तयारीमध्ये आहे. नवी मुंबईत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर लॉटरी निघणार आहे. नवी मुंबईतील विविध नोडमध्ये तसेच रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या तब्बल ४० हजार घरांची लॉटरी निघणार आहे. वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ सिडकोची ही घरं असणार आहे.

सिडकोने नवी मुंबईतील विविध ठिकाणी आणि रेल्वे स्टेशनजवळ तब्बल ४० हजार घरांची निर्मिती केली आहे. नवी मुंबईत घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे. या लॉटरीमध्ये ग्राहकांना कोणत्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाचे घर पाहिजे हे निवडण्याची खास मुभा देण्यात आली आहे. जर सिडकोने म्हाडाप्रमाणे घरांच्या किमती कमी केल्या तर या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण आणखी वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT