Navi Mumbai Viral Video News Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Navi Mumbai Viral Video News : नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाच्या पुतळ्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नवी मुंबईत आगरी-कोळी समाजाच्या पुतळ्याचा अवमान

  • सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

  • वाशी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले

  • समाजामध्ये संतापाची लाट

  • प्रकरणाचा पुढील तपास सुरू

विकास मिरगणे, नवी मुंबई

Navi Mumbai Aagri Koli Statue Controversy Viral Video नवी मुंबई शहरातील आगरी-कोळी समाजाच्या पुतळ्याचा अवमान करत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे आगरी-कोळी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

नवी मुंबई शहर वसण्यापूर्वी या परिसरात आगरी समाज शेती करत होता, तर कोळी समाज मासेमारीचा व्यवसाय करत होता. शहरीकरणानंतर शेती हळूहळू संपुष्टात आली असली तरी शहराची ओळख म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून आगरी-कोळी समाजाचे पुतळे विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत.

दरम्यान, काही तरुणांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी या पुतळ्यांबाबत अत्यंत अपमानास्पद आणि गलिच्छ वक्तव्य करत व्हिडिओ तयार केला व तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ समोर येताच आगरी-कोळी समाजामध्ये संतापाची लाट उसळली. संबंधित तरुणांवर तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाशी पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान संबंधित इंस्टाग्राम आयडीचा माग काढण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड परिसरातून संबंधित मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा अल्पवयीन असून त्याला पुढील कारवाईसाठी बालन्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP: आधी पार्थ खासदार, आता जय पवारांकडे मोठी जबाबदारी; सुनेत्रा पवारांनी सूत्रे फिरवली

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Metro 9 And Metro 2B: मुंबईकरांची प्रतिक्षा कायम! मेट्रो ९ अन् 2B चे उद्घाटन लांबणीवर; कारण काय?

Cyber Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! मुंबईतील न्यायमूर्तींना एपीके फाईल पाठवून गंडवलं, नेमकं घडलं काय?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचे १२ वर्षानंतर धमाकेदार कमबॅक, पहिली झलक तुम्ही पाहिली का?

SCROLL FOR NEXT