Navi Mumbai Metro File Photos Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांची १२ वर्षांची प्रतीक्षा संपणार! नवी मुंबई मेट्रो लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला

Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांची १२ वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Metro:

नवी मुंबईकरांची १२ वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. तसेच यादिवशी नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संभाव्य दौऱ्याची नवी मुंबई शहरात लगबग सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती हाती आली आहे. एकाच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा संभाव्य दौरा नवी मुंबईत आयोजित केला जात आहे.

गेल्या 13, 14 ऑक्टोबर आणि त्यानंतर 17 ऑक्टोबरची तारीख नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी निश्चित करण्यात आली होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आजतागायत हा योग जुळून आला नव्हता. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

मात्र, आता ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य नवी मुंबई दौरा आखण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारसह नवी मुंबईतील विविध शासकीय प्राधिकरणे पंतप्रधान मोदी यांच्या संभाव्य दौऱ्याच्या तयारीला लागले आहेत.

नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासह त्याच दिवशी राज्य सरकारद्वारे नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर आयोजित नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या शुभारंभ करण्यात येणार आहे.

या प्रसंगी उपस्थित महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. या महिला मेळाव्यास संपूर्ण राज्यातून विविध महिला बचत गटातील 1 लाखाहून अधिक महिला उपस्थित राहाणार असल्याची माहिती आहे. यामुळे शासन यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT