Manoj Jarange Patil News Saam Tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: 'मराठा आरक्षणाच्या आड आला की सुट्टी नाही', जरांगे पाटील यांनी नेमका कोणाला दिला इशारा?

Maratha Reservation : 'मराठा आरक्षणाच्या आड आला की सुट्टी नाही', जरांगे पाटील यांनी नेमका कोणाला दिला इशारा?

Satish Kengar

>> सिद्धेश म्हात्रे

Manoj Jarange Patil in Navi Mumbai:

''ते म्हणतात, माझ्या एकट्याच्याच मागे लागलाय, परवा दिवशी टोकायची गरज होती का? मी स्वतःहून कोणावर टीका करत नाही. मराठा आरक्षणाच्या आड आला की सुट्टी नाही'', असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर टीका केली असल्याचं बोललं जात आहे. नवी मुंबई येथे झालेल्या सभेत ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ''70 वर्षांपासून आपली मुलं आरक्षणाची वाट बघत आहेत, आपण पण गनिमीकावा करतो. मी सातारा सांगतो पुण्याला जातो. म्हणून आता पर्यंत 70 टक्के लढाई जिंकली. मराठा आरक्षणाच्या विजयाच्या सुवर्ण क्षण जवळ आला आहे. मराठ्यांचा विजय होईल म्हणून मी शांत ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ''मराठा समाज ओबीसी समाजात वाद निर्माण करा हेच सुरु आहे, हे आपल्याला उचकवणार आहेत, यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, ही मराठ्यांच्या खांद्यावर जबाबदारी.'' (Latest Marathi News)

जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण जवळ आलं आहे. त्यामुळे राग अपमान पचवला. ते म्हणाले, ''सरसकट आरक्षण देण्याचा कायदा 24 डिसेंबरला होईल. 25 डिसेंबरला बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा सांगितली जाईल. आम्हाला मुंबईत यायचं नाही, मात्र समुद्र कसा घरे कशी ते बघायचंय. मंत्रालय कसे ते बघायचंय.''

जरांगे पुढे म्हणाले, ''एक मंत्री माझ्याकडे आला, तो म्हणाला आरक्षण देता येत नाही, कुणबी पत्र देता येत नाही. मी म्हंटल जाऊदे. तुमची जात ओबीसी आरक्षणात कशाच्या आधारावर गेली एवढं सांगा. मराठ्यांची कुणबी पोटजात होत नाही का, अशी 7 ते 8 जण येऊन गेली. मात्र ते परत आले नाहीत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT