Navi Mumbai Airport Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport: एकाच वेळी ३५० विमाने उभी राहणार, ३.७ KM चा रनवे; सहा महिन्यात नवी मुंबईचं एअरपोर्ट सुरू होणार

International Airport In Navi Mumbai: ३१ डिसेंबर रोजी विमानतळावर उड्डाणांची चाचणी केली जाणार आहे. पुढे एप्रिल २०२५ पासून विमाने नियमितपणे उड्डाणे करु शकणार आहेत.

Saam Tv

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच विमानतळाच्या धावपट्टीवर व्यावसायिक विमानांच्या उड्डाणांची चाचणी होणार असल्याचेही म्हटले जात आहे. या विमानतळात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत. शिवाय अंडरग्राउंड मेट्रोने विमानतळ जोडले जाणार आहे. विमानतळाला पोहचण्यासाठी प्रवाश्यांना मेट्रो, द्रुतगती महामार्ग, अटल सेतू यांच्यासह बुलेट ट्रेनचा पर्याय देखील पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

३१ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणांची चाचणी सुरु होणार आहे. एप्रिल २०२५ पासून विमानांना नवी मुंबईहून उड्डाण करण्याची परवानगी मिळणार आहे. मुंबई आणि जवळच्या परिसरामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. नवी मुंबई विमानतळामुळे हा प्रश्न काही प्रमाणात नक्कीच कमी होईल अशी आशा आहे.

नवी मुंबई विमानतळाचे वैशिष्ट म्हणजे यात एकाच वेळेस ३५० विमान एकत्र उभी करता येऊ शकणार आहेत. त्याशिवाय ७६ खासगी जेट विमान देखील तेथे राहू शकतात. विमानतळाच्या धावपट्टीचा ३.७ किमीचा रस्ता पूर्णपणे तयार आहे. लवकरच आणखी एक धावपट्टी देखील तयार करण्यात येणार आहे. तसेच तेथे देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम देखील तयार केली जाणार आहे.

हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे तयार झाल्यावर दरवर्षी तब्बल ९ कोटी प्रवासी विमानाने प्रवास करु शकणार आहेत. वाहतुकीव्यरिक्त, या विमानतळामुळे आसपासच्या परिसराची आर्थिक वृद्धी देखील होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना जोडल्याने परिसरातील व्यवसायांना नक्कीच फायदा होईल. त्यासोबत रोजगाराची संधीही निर्माण होईल. याशिवाय शॉपिंग मॉल, पंचतारांकित हॉटेल्स देखील उघडली जाणार आहेत.

जाहा हदीद या जगप्रसिद्ध आर्किटेक्टने नवी मुंबई विमानतळाचे डिझाईन तयार केले आहे. विमानतळाचे काम चार टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. यातील पहिला टप्पा एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होईल. तर दुसरा टप्पा २०२९ पर्यंत पूर्ण व्हावा यासाठी काम सुरु आहे. तिसरा टप्पा २०३२ तर चौथा टप्पा २०३६ पर्यंत पूर्ण होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT