Navi Mumbai International Airport News Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव? केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला प्रस्ताव

Navi Mumbai Airport Latest News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव? केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला प्रस्ताव

Satish Kengar

>> सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Airport Latest News:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यासंबंधी कॅबिनेमध्ये निर्णय होऊनही अद्याप नामांतरण झाले नाही. यातच आज विमानतळ कृती समितीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, आमदार गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, राजू पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी विमानतळास दि बा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकार कडून केंद्राला पाठविण्यात आला असून लवकरच केंद्राच्या मंजुरीनंतर विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलेय. (Latest Marathi News)

राज्य सरकारने केंद्रीय दि बा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव एव्हिएशन विभागाकडे पाठविला होता. केंद्रीय एव्हिएशन विभागाकडून हा प्रस्ताव आता पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकी आधी नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देऊन केंद्र सरकार प्रकल्पग्रस्थान्ना भेट देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT