सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही
नवी मुंबईतील कामोठ्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. कामोठ्यातील एका इमारतीच्या घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. घरातील दोन्ही मृतांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण आहेत. नवी मुंबईतील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेन्टमध्ये दोन मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. या दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळला आहे. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण असल्याची माहिती हाती आहे.
पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचे आढळलून आले. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहे. ही घटना हत्या की आत्महत्येची आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांकडून सोसायटीचे सीसीटीव्ही पाहण्यास सुरवात करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम आपार्टमेंटमध्ये माय लेकाचा मृतदेह आढळला आहे. या दोघांचीही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. कामोठे परिसरातील ड्रीम हौसिंग सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 104 चा दरवाजा आतून बंद आहे. घरातील व्यक्ती काहीही प्रतिसाद देत नाहीत, अशी माहिती कामोठे पोलिसांना मिळाली. त्यानंतर कामोठे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीसांनी दरवाजा बाहेरून उघडून घराची पाहणी केली.
त्यावेळी आतमध्ये 70 वर्षीय गीता भूषण जग्गी आणि त्यांचा 45 वर्षीय मुलगा जितेंद्र भूषण जग्गी हे मृत अवस्थेत आढळले. घरात माय लेकाचे मृतदेह आढळल्याने कामोठे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृत गीता जग्गी यांचा मुलगा जितेंद्र याच्या अंगावर मारल्याचे व्रण असल्याने पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केलाय. त्यासोबतच पोलीसांनी घरात प्रवेश केला, त्यावेळी घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचे आढळले होते.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. या प्रकरणात हत्या की आत्महत्या याचा तपास करण्यात येतोय. पोलिसांतर्फे सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले जात असून कामोठे पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.