CCTV Footage Saam TV
मुंबई/पुणे

CCTV Footage : घरमालकाकडून घरात घुसून भाडेकरू महिलेला मारहाण; पाहा घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ

Navi Mumbai : त्यामुळे महिला त्या व्यक्तीकडे डिपॉझीटचे पैसे मागू लागली. याचा घरमालकाला फार राग आला. त्यामुळे त्याने थेट महिलेले मारहाण करण्यास सुरूवात केली.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबईतील शाहबाज गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरमालकाने आपल्या घरी राहणाऱ्या भाडेकरू महिलेला घरात घुसून मारहाण केली आहे. डिपॉजिटचे पैसे मागीतल्याने ही मारहाण झाल्याचं कारण समोर आलं आहे.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर घरमालकाकडे महिलेने तिचे डिपॉझीटचे पैसे होते. घर बदलण्यासाठी तिला ते पैसे परत पाहिजे होते. त्यामुळे महिला त्या व्यक्तीकडे डिपॉझीटचे पैसे मागू लागली. याचा घरमालकाला फार राग आला. त्यामुळे त्याने थेट महिलेले मारहाण करण्यास सुरूवात केली.

घरमालकाने भर रस्त्यात धक्काबुक्की करत महिलेसह तिच्या आईला देखील मारहाण केली आहे. या घटनेनंतर महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठले. तसेच प्रकरणी घर मालक अमीर अन्सारी विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या घटनेचा सिसीटीव्ही देखील समोर आला आहे. असून महिलेला मारहाण करणाऱ्या अमीर अन्सारी विरोधात रोष व्यक्त करण्यात येतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलेला मारहाण होत असताना रस्त्यावर सर्व बघ्यांनी गर्दी केली आहे. घरमालक इतका रागात होता की, महिलेला त्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी पटकण कोणीही पुढे येत नाहीये.

सदर घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त करतायत. सदर घरमालकाविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT