Navi Mumbai Polic Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: नाकाबंदीदरम्यान कारला अडवल्याचा राग, तरुणाने पोलिसाला २०० मीटरपर्यंत फरफटत नेलं; थरारक VIDEO

Navi Mumbai Police: नवी मुंबईमध्ये भयंकर घटना घडली. पोलिसाला कारने धडक देत फरफटत नेले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पोलिस नाकाबंदी सुरू असताना भंयकर घटना घडली. एका अनियंत्रित कारने पोलिसाला धडक देऊन थेट २०० मीटरपर्यंत फरफटत नेले. वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांनी कार चालकाला थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने न थांबता पोलिस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांना धडक दिली आणि त्यांना फरफटत नेले. या भयानक अपघातात भोई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली परिसरात पोलिस नेहमीप्रमाणे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका भरधाव कारला पोलिसांनी अडवले. पण चालकाने कार न थांबवता थेट समोर उभ्या असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर भोई हे गाडीच्या बोनेटवर फेकले गेले तरीही चालकाने कार न थांबवता त्यांना तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेले.

आरोपी बनावट नंबर प्लेट असलेली कार घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. या भयानक अपघातात पोलिस कॉन्स्टेबल दिलीप भोई हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाकाबंदीला चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, या कारवर असलेला नंबर देखील बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. सध्या कळंबोली पोलिस या अज्ञात २ व्यक्तींचा आणि बनावट नंबर असलेल्या कारचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू आहे. या घटनेमुळे कळंबोली परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS Captain: पंजाब किंग्जमध्ये एन्ट्री; हार्दिक पंड्यानेच सांगितला संघाचा कॅप्टन कोण? पोस्ट व्हायरल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची ई डी आणि सी बी आयकडून चौकशी होणार

Death News : माजी निवडणूक आयुक्त आदित्य सिंह यांचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

IPL 2027 आधी संघांमध्ये मोठी अदलाबदल; हार्दिक पंजाबकडून खेळणार, अर्शदीप मुंबईच्या ताफ्यात!

HDFC Bank चा ग्राहकांना झटका! MCLR मध्ये १५ बेसिस पॉइंट्सची वाढ; आता होम लोन महागणार?

SCROLL FOR NEXT