Navi Mumbai, Crime Branch, Mumbai, Thane saam tv news
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime Branch : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून रिक्षा चोरणारी टोळी गजाआड

गेल्या वर्षभरात केवळ नवी मुंबईतून १५० पेक्षा अधिक रिक्षा चोरीला गेल्या होत्या.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Breaking News : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून रिक्षा चोरी करणा-या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई क्राइम ब्रांचने ही कारवाई केली आहे. या टाेळीतील आणखी दाेन संशयितांचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिस (police) खात्यातील अधिका-यांनी दिली. (Tajya Batmya)

गेल्या वर्षभरात केवळ नवी मुंबईतून १५० पेक्षा अधिक रिक्षा चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या हाती धागेदोरे लागत नव्हते. त्यामुळे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये माेठी वाढ झाली होती.

अखेर नवी मुंबई (navi mumbai) पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी या गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रॅन्च युनिटकडे (Navi Mumbai Crime Branch) साेपविला. या विभागाच्या पथकास नुकतेच माेठं यश आले. पाेलिसांनी चार संशयितांना पकडले. त्यांच्याकडून अधिक चाैकशी केली असता आणखी दाेन जणांचा चाेरीच्या गुन्ह्यात समावेश असल्याचे उघड झाले.

पाेलिसांनी चार संशयितांना गोवंडी, मानखुर्द येथून अटक (arrest) केली आहे. दाेघांचा शोध सुरू आहे. एकूण ७ लाखाचा मुद्देमाल असलेल्या १० रिक्षा संशयितांकडून जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती क्राइम ब्रांचचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT