Navi Mumbai News: Saamtv
मुंबई/पुणे

Washi Bomb Threat: ब्रेकिंग! वाशीमधील मॉलमध्ये बाँम्ब ठेवल्याची धमकी, संपूर्ण परिसर रिकामा; प्रशासन अलर्ट|VIDEO

Washi Inorbit Mall Bomb Threat: नवी मुंबई मधील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल मध्ये बॉम्ब असल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

नवी मुंबई| ता. १७ ऑगस्ट २०२४

नवी मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाला मॉल मध्ये बॉम्ब असल्याचा मेल आल्याने संपूर्ण मॉल खाली करण्यात आला असून तपासणी सुरू आहे.

मॉलमध्ये बाँम्ब ठेवल्याची धमकी!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाला मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. यानंतर नवी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

प्रशासन अलर्ट

पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ संपूर्ण मॉल रिकामा केला असून सध्या तपास सुरू आहे. तसेच बाँब शोधपथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. इनॉर्बिट मॉल वाशी परिसरातील प्रसिद्ध मॉल असल्याने लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. अशातच असा धमकीचा मेल आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये नाव, मोबाईल नंबर अन् पत्ता किती वेळा बदलता येतो?

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई, केनियाच्या नागरिकाला अटक; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं ६००० रुपयांनी झालं स्वस्त, आजचे 18K- 22K आणि 24K चे दर किती?

Famous Actor : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

SCROLL FOR NEXT