navi mumbai news  Saam tv
मुंबई/पुणे

नवी मुंबईत घडली मोठी दुर्घटना, कोंचिग क्लास सुरू असताना स्लॅब कोसळला; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

navi mumbai news : नवी मुंबईतील मोठी दुर्घटना घडलीये. कोंचिग क्लास सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला

14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

अग्निशमन दलकडून 12 विद्यार्थी व शिक्षिका रेस्क्यू

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेच्या सेक्टर २, प्लॉट नंबर १२ येथील विद्याभवन सोसायटीत गुरुवारी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या तळमजल्यावर घरगुती क्लास सुरु होता. त्याचवेळी पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

स्लॅब कोसळल्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांची एकच धावाधाव झाली. या घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. अग्निशमन विभागाने एकूण 12 विद्यार्थी आणि 1 शिक्षिका अशा एकूण 13 जणांना सुरक्षित बाहेर काढलं. यापैकी चार ते पाच विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रुग्णालयात दाखल केलेला जखमी मनिष राहुल म्हसे या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनिषचा मृत्यू झाल्याची माहिती वाशी मनपा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेस्क्यू करण्यात आलेल्यांची नावे :

सिद्धांत गुप्ता (वय 8)

प्रिन्स सोनी (वय 11)

आयशा

कुसुम (वय 15)

निष्का धनवाडे (वय 14)

आराध्या बोडसे (वय 14)

तन्वी श्रीवास्तव (वय 7)

देवांश पुजारी (वय 12)

राजदीप वानखेडे (वय 10)

पार्थ खैरनार (वय 14)

रुद्र येलूरकर (वय 5)

शिक्षिका शामली चौधरी (वय 53)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: आता फक्त २३ ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत "ड्राय डे" घोषित

'डबल अटॅक'! हिवाळा ठरणार अत्यंत भयानक; अल नीनोच्या नव्या धोक्याने शास्त्रज्ञही चक्रावले, हवामानाचा धक्कादायक रिपोर्ट

Aadi Anant: आजोबा-नातवाच्या नात्याचा हळवा प्रवास; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘आदि अनंत’चा ट्रेलर रिलीज

Thursday Horoscope: धनलाभाचे योग अन् नात्यांत गोडवा; या ४ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT