पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील Saam tv
मुंबई/पुणे

राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाकडून PCMC आयुक्त राजेश पाटील यांच्या चौकशीचे आदेश!

महापालिकेच्या सफाई कामगारांशी असभ्य भाषेत तोंडी संवाद साधल्या प्रकरणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची पुढील तीस दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या सफाई कामगारांशी असभ्य भाषेत तोंडी संवाद साधल्या प्रकरणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची पुढील तीस दिवसात चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत.

हे देखील पहा :

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरव राव आणि राज्य शासनाला लेखी पत्र पाठवून महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची चौकशी आणि कारवाई करण्यात यावी अशा सूचना राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिल्या आहेत.

2021 च्या जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सफाई कामगार त्यांच्या विविध प्रश्नांवरील चर्चेसाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे गेले होते. त्या चर्चेदरम्यान आयुक्त राजेश पाटील यांनी सफाई कामगारांशी असभ्य तसेच कठोर भाषेत संवाद साधला असा आरोप विधिज्ञ सागर चरण यांनी केला आहे. ऍड.सागर चरण यांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने आयुक्त राजेश पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT