Nasarapur Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Nasarapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळाला, भीमराव कांबळेला फाशी, वाचा संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम

Nasarapur Crime Case Timeline: नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण नेमकं कुठे घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम...

Priya More
  • नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

  • १ मे रोजी चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती

  • पुणे ग्रामीण पोलिसांनी १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र दाखल केले

  • अवघ्या ५८ दिवसांत खटल्याचा निकाल लागून पीडितेला न्याय मिळाला

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने आज मोठा निर्णय सुनावला. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या न्यायालयाच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. जलदगतीने सुनावणी होऊन या प्रकरणाचा निकाल लावण्यात आला. हे प्रकरण अतिशय दुर्मिळ आहे. आरोपीने किळसवाणे कृत्य केले असून तो समाजासाठी कलंक आहे, असे म्हणत कोर्टाने आरोपीला कठोरात कठोर शिक्षआ सुनावली. या निर्णयानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने डॉक्टर, पोलिसांची टीम सर्वांचे आभार मानले. हे प्रकरण नेमकं काय होतं आणि त्याचा घटनाक्रम काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत...

नसरापूर प्रकरणचा संपूर्ण घटनाक्रम -

१ मे २०२६ - भोरच्या नसरापूरमधून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही तासांनंतर तिचा मृतदेह सापडला. मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे तपासातून उघड झाले.

२ मे २०२६- पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी भिमराव कांबळेला अटक ताब्यात घेतलं. आरोपीविरोधात अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.

मे २०२६ चा पहिला आठवडा - शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय तपासणीचे अहवाल पोलिसांना मिळाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले.

मे २०२६ चा पहिला आठवडा - नसरापूर, भोर आणि परिसरात नागरिकांनी निषेध आंदोलने केली. पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली गेली.

मे २०२६ चा पहिला आठवडा - पोलिसांनी मध्यरात्री आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, 'डीएनए', साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे जमा करण्यात आले.

१६ मे २०२६ - अवघ्या १५ दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे १,२०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

२८ मे २०२६ - न्यायालयाने भिमराव कांबळेविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.

जून २०२६ - सरकारी पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले. या प्रकरणात अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली.

२० जून २०२६ - दोन्ही बाजूंचे न्यायालयामध्ये अंतिम युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.

२५ जून २०२६ - न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याचे नियोजन केले गेले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि या प्रकरणाचा निकालावर अंतिम सुनावणी २९ जूनला होईल हे सांगितलं.

२९ जून - या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आरोपीने समाजासाठी कलंक असून त्याने किळस आणणारे कृत्य केले असल्याचे न्यायालयाने सांगितले.

२९ जून - नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण हे जलदगतीने सुनावणी होऊन निकाल लागलेल्या देशातील प्रकरणांपैकी एक ठरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी जंतर - मंतर मध्ये दाखल

Blocked blood vessels: शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागल्या की पायांमध्ये दिसतात ही 3 लक्षणं

महाराष्ट्रात ‘डेल्टा’ कायदा येणार; जमिनीच्या सुप्त मूल्याला मिळणार नवी दिशा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Relationship vs Affair: रिलेशनशिप आणि अफेअर यांच्यात नेमका काय फरक आहे?

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! दरमहा फक्त ₹12,500 गुंतवा अन् मिळवा १ कोटी, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT