Naresh Mhaske saam tv
मुंबई/पुणे

Naresh Mhaske News: काही नेते मातोश्रीवर बसून व्हिडिओ व्हायरल करण्याच्या सूचना देत होते, नरेश म्हस्केंचा थेट आरोप

Sheetal Mhatre Viral Video: नरेश म्हस्के यांनी काही नेते मातोश्रीवर बसून इतर आमदार आणि खासदारांना व्हिडिओ पाठवून व्हायरल करण्याच्या सूचना देत होते असा गंभीर आरोप केला आहे.

Chandrakant Jagtap

Mumbai News: शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल म्हात्रे यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यानी ठाकरे गटाने हा व्हिडिओ व्हायरल केला, असा आरोप केला आहे. या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते.

यावेळी नरेश म्हस्के यांनी काही नेते मातोश्रीवर बसून इतर आमदार आणि खासदारांना व्हिडिओ पाठवून व्हायरल करण्याच्या सूचना देत होते असा गंभीर आरोप केला आहे. तसतेच राजकीय लढाई ही तत्वांची असते विचारांची असते. त्यात असे प्रकार घडणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

जी स्त्री आपल्या विचारांनी आणि तत्त्वांनी राजकीय विरोध करत असते तिला उत्तर देता येत नाही म्हणून अशा प्रकारे तिची निंदानालस्ती करणे योग्य नाही. याचा प्रत्येक स्त्रीने निषेध केला पाहिजे. उद्धव बाळासाहेब गटाच्या अधिकृत पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला. काही नेते मातोश्रीवर बसून इतर आमदार, खासदार आणि नेत्यांना हा व्हिडिओ व्हायरल करण्यास सांगत होते हे मी खात्रीलायकपणे सांगतो असे नरेश म्हस्के म्हणाले आहेत. (Maharahshtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer : अतिवृष्टीमुळे बेजार; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, कारीत पंधरा दिवसात दुसरी घटना

Abhang Tukaram: हा मराठी अभिनेता झळकणार खलनायक अवतारात; 'अभंग तुकाराम'मध्ये साकारणार खास भूमिका

डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न तुटलं; मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांती पुरस्कार

Narnala Fort History: ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण, अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला माहितेय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT