Narendra Dabholkar Case Verdict How Virendra Tawde Sanjeev Punalekar Vikram Bhave was acquitted by Pune Sessions Court Saam TV
मुंबई/पुणे

Narendra Dabholkar Case Verdict: तावडे, भावे, पुनाळेकर या तिघांची निर्दोष सुटका कशी झाली? कोर्टानं निकाल देताना नेमकं काय सांगितलं?

Pune Court on Dr. Narendra Dabholkar Case: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज (ता. १०) पुणे सत्र न्यायालयाने जाहीर केला. तब्बल ११ वर्षांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात निकाल लागला.

Satish Daud

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज (ता. १०) पुणे सत्र न्यायालयाने जाहीर केला. तब्बल ११ वर्षांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात निकाल लागला. या प्रकरणात एकूण ५ आरोप होते. त्यापैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याशिवाय न्यायालयाने आरोपींना ५ लाखांचा दंडही ठोठावला. इतर तीन आरोपी वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे, यांची कोर्टाने निर्दोष सुटका केली. डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात कटकारस्थान रचल्याचा वीरेंद्र तावडे आरोप होता.

तर आरोपी संजीव पुनाळेकर याने मारेकऱ्यांना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय विक्रम भावे हा देखील कटात सहभागी होता. दरम्यान, तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे.

मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत, असं कोर्टाने म्हटलं. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. त्या आधारे दोघांना जन्मठेपीची शिक्षा आणि प्रत्येकी ५ लाख दंड ठोठावण्यात येत आहे, असं कोर्टाने निकाल देताना म्हटलं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळी सव्वा सातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. यात दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसी निवडणुकीत महायुती होणार; शिवसेना भाजप जागावाटपाबाबत बैठका सुरू

नमो भारत एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवले, आता अंगाशी येणार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूण-तरुणीवर गुन्हा

Mobile Ban: महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी; १५ गावातील ग्रामपंचायतींचा तालिबानी आदेश

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सनं केलं कॅप्टन

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

SCROLL FOR NEXT