Narayan Rane On Uddhav Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Narayan Rane News: ...तर उद्धव ठाकरेंची झोप उडेल, असं काय आहे नारायण राणेंकडे; भर पत्रकार परिषदेत सांगितलं...

Narayan Rane On Uddhav Thackeray: ...तर उद्धव ठाकरेंची झोप उडेल, असं काय आहे नारायण राणेंकडे; भर पत्रकार परिषदेत सांगितलं...

Satish Kengar

>> सुरज मसुरकर

Narayan Rane On Uddhav Thackeray:

''लंडनला का जातात, तिकडे काय सुरु आहे. बरेच कागद माझ्याकडे आलेत. मी योग्य जागेवर पोहचवले आहेत. झोप नाही लागणार,'' असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेनावर टीका करत ते म्हणाले की, बाळासाहेबांनी हिंदू धर्माच मराठी माणसाचं रक्षण व्हावे यासाठी आयुष्य घालवलं. यांनी काय केल? बाळासाहेबांनी तडजोड नाही केली. मात्र यांनी मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली. ज्यांनी शिवसेनेला संपवायची भाषा केली त्यांच्या सोबत गेले.

राणे म्हणाले की, ''सध्या महाराष्ट्रात दोरे सुरु आहेत. मुख्यमंत्री असताना मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते. आता कशाला फिरत आहेत. सामनात स्टाईलमध्ये फिरत आहेत.''  (Latest Marathi News)

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीवर नारायण राणे म्हणाले, ''हयातमध्ये मिटिंग झाली. मी साहेबांना फार जवळून पाहिलं आहे. ते कधी कोणाच्या घरी गेले नाहीत. देशपातळीवरील नेते मातोश्रीत यायचे. पदासाठी लाचारी केली नाही.''

काही दिवसांपूर्वीच भारतात G-20 परिषद पार पडली. यावर बोलताना राणे म्हणाले, वातावरण एका सणासारख होतं. आनंद होता. सर्वजण मोदींचं कौतुक करत होते. भारताच नाव जगात वाढवल त्यासाठी त्यांचे आभार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

SCROLL FOR NEXT