'त्या' चिल्लर ला पर्यटन म्हणजे काय माहित देखील नव्हतं; नारायण राणेंची सेनेच्या नेत्यांवर टीका Saam Tv
मुंबई/पुणे

'त्या' चिल्लर ला पर्यटन म्हणजे काय माहित देखील नव्हतं; नारायण राणेंची सेनेच्या नेत्यांवर टीका

फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्यायला पाणी नसायचे, शिक्षणाची दुरावस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात होती.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : उद्या चिपी Chipi Airport विमानतळाचे उदघाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवरती आज केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी भाजप कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या नेहमीच्या शैलीत शेवसेनेच्या कोकणातील नेत्यांवरती टीका केली आहे. आता जी चिल्लर फिरते ना हे "आम्हीच केलं, आम्हीच केलं' म्हणतं त्यांना पर्यटन Tourism म्हणजे काय माहीत देखील नव्हते असा टोला नारायण राणेंनी कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे. (Narayan Rane criticizes Shivena leaders)

हे देखील पहा -

सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्ह्याचा विकास व्हावा मला नेहमी वाटत होते. फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्यायला पाणी नसायचे, शिक्षणाची दुरावस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात होती तसेच गरिबी होती दरिद्री जिल्हा म्हणून सिधुदुर्ग जिल्ह्याला संबोधित करायचे मात्र टाटा कंपनीने Tata Company मला रिपोर्ट दिला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनातून Tourism उभा राहू शकतो आणि त्यावरती मी काम केलं असं देखील ते म्हणाले.

तसेच आता जी चिल्लर फिरते ना, जे ते "आम्हीच केलं आम्हीच केलं' म्हणत त्यांना पर्यटन म्हणजे काय माहीत देखील नव्हते. असा टोला नारायण राणेंनी कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांना Shivsena Leaders लगावला आहे. पर्यटन उभे करत असतांना हॉटेल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवले मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला गोपीनाथ मुंडेसारखे Gopinath Mundhe चांगले साथी मिळाले असंही राणे म्हणाले.

रस्ते,पाणी, सोयीसुविधा मी केल्या विनायक राऊत Vinayak Raut कुठे होते तेव्हा परदेशी पर्यटक 40 टक्के देशातील पर्यटक 60 टक्के लक्षात घेत विमानतळ उभारले गेले प्रफुल्ल पटेल Praful Patel नागरी उड्डाण मंत्री असतांना मी सिंधुदुर्ग विमानतळाची मागणी केली सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल यांच्याशी तडजोडी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल यांची जिल्ह्यातील 4 ते 5 महसूल कामे करून दिली तेव्हा त्यांनी आपनाला परवानगी दिली असल्याचा खुलासा केला तसेच चिपी विमानतळाच्या आमंत्रण पत्रिकेत माझे नाव किती छोटे झाले आहे हे बघा राजकारणात आणि प्रोटोकॉल प्रमाणे मी मोठा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे नाव पहिला दिले गेले आम्ही केले आम्ही केले ही ओरड करत आहेत.

विकास कामात पैसे खाल्ले गेले

राजकारणात प्रोटोकॉल असतो पण माझेच नाव छोटे का ? केले असा प्रश्न उपस्थित करत कोकणात हायवे व्हावा यासाठी पुढाकार घेतला नितीन गडकरी यांनी तरतूद केली विनायक राऊत यांनी काय केले ? रेतीच्या गाड्या विनायक राऊत यांनी अडवल्या. शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी कंत्राटदाराला धमकावत कार घेतल्या याचे फोटो आहेत माझ्याकडे जिल्ह्याच्या विकास कामात पैसे खाल्ले गेले आणि खासदार झाले असे गंभीर आरोप देखील राणे यांनी यावेळी केले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT