Nalasopara Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Nalasopara Crime News: पोलिसांनी सूत्रे फिरवली, अवघ्या 8 तासांत नालासोपाऱ्यातील खुनातील आरोपींना केलं अटक

पोलिसांनी सूत्रे फिरवली, अवघ्या 8 तासांत नालासोपाऱ्यातील खुनातील आरोपींना केलं अटक

चेतन इंगळे

Nalasopara News : नालासोपारा उड्डापूलावर रोहीत यादव या तरूणाच्या हत्याप्रकरणात नालासोपारा पोलिसांनी वेगाने तपास करून अवघ्या ८ तासात ३ आरोपींना अटक केली आहे. त्यातील दोन आरोपी हे मुंबई महापालिकेतील कर्मचारी आहेत. उड्डाणपूलावर दुचाकी ओव्हरेटक करताना झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली होती.

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथे राहणारा रोहीत यादव (२०) हा तरूण मित्र विकेश चौधरी याच्यासह रविवारी कळंब येथे फिरण्यासाठी गेला होता. आपल्या दुचाकीवरून ते घरी परतत होते. रोहीत यादव हा त्याचा मित्र विकेशच्या दुचाकीच्या मागे बसला होता.

सव्वाचारच्या सुमारास ते नालासोपारा उड्डाणपूलावर आले. तेथे वाहतूक कोंडी होती. यावेळी विकेशने अन्य एका दुचाकीला ओव्हरटेक करून आपली दुचाकी पुढे न्यायचा प्रयत्न केला. यामुळे त्याच्या गाडीचा आरसा त्या दुचाकीच्या आरशला लागला. याचे निमित्त होऊन वाद झाला. दुसर्‍या दुचाकीवर तीन जण होते. त्यांनी रोहीत आणि विकेश चौधरी यांना ठोसाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. (Latest Marathi News)

या मारहाणीत रोहीतच्या छाती आणि पोटाला जबर मार लागला आणि तो बेशुध्द झाला. ते पाहून दुचाकीवरील तिन्ही आरोपी पसार झाले. बेशुध्दावस्थेतील रोहीतला पालिकेच्या तुळींज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे रात्री ७ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

नालासोपारा पोलिसांनी याप्रकऱणी ३ अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकऱणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली. सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वरळीतून निलेश पुजारी याला अटक केली. त्यानंतर पंकज बोरिचा आणि निलेश सिंग या दोघांना नालासोपारा पूर्वेतून अटक केी.

आरोपी निलेश पुजारी आणि पंकज बोरीचा हे मुंबई महापालिकेत जंतुनाशक फवारणीचे काम करतात. निलेश सिंग हा कॅटरिंगचे काम करतो. तीन्ही आरोपी ३० ते ३५ वर्ष वयोगटातील असून नालासोपारा येथे राहणारे आहेत. या तिघांना १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT