BJP leaders celebrate victory after winning Ambernath and Badlapur municipal councils, dealing a blow to Shinde Sena. saam tv
मुंबई/पुणे

Local Body Election: एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फुललं कमळ, महापालिकेआधीच शिंदेसेनेची कोंडी

BJP Win In Ambernath and Badlapur : भाजपनं ऑपरेशन लोटस सुरु करुन शिंदेसेनेला अस्वस्थ केलं होतं. मात्र आता थेट शिंदेंचा बालेकिल्ला असलेली बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका भाजपनं भेदलीय.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

भाजपनं थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करत सत्ता मिळवली.

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेत शिंदेसेनेला मोठा धक्का बसला.

गेल्या २५ वर्षांची शिवसेनेची सत्ता भाजपनं उलथवून लावली.

नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपपाठोपाठ शिंदेसेनेने मुसंडी मारत गुलाल उधळला. पण खुद्द शिंदेंच्या बालेकिल्यात मात्र भाजपनं सत्ता हिसकावून घेतलीय. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय.गेल्या 25 वर्षांपासून इथे शिवसेनेची एकहाती सत्ता होती. शिंदेसेनेनंही तिथं आपलं चांगलचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. मात्र आता शिंदेसेनेचा अंबरनाथ आणि बदलापूरचा हाच बालेकिल्ला ढासळायला लागलाय.

भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत. दणदणीत विजय मिळवलाय. तर दुसरीकडे बदलापूर कुळगाव नगरपरिषदेत शिंदेसेनेला जोरदार धक्का बसलाय.तिथे भाजपच्या रुचिता घोरपडेंनी शिंदेसेनेच्या वीणा म्हात्रेंना पराभवाची धूळ चारलीय.

नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे राज्यभरात फिरुन प्रचार केला होता. त्यामुळे ठाण्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांच्या निवडणुकीची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे होती. या दोन्ही नगरपरिषदा श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे याठिकाणी श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र मित्रपक्ष असणाऱ्या भाजपनंही शिंदेच्या अभेद्य अशा गडात प्रवेश केल्यानं शिंदेसेनेपुढे मोठं आव्हानं निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोने-चांदीचे दर वाढले

Home Decoration Ideas : या ६ प्रकारे सजवा तुमच्या स्वप्नातील नवीन घर, अधिक सुंदर दिसेल

Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Kidney Damage: व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या किडनीचं करतात नुकसान; तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे एकदा वाचाच

भीषण अपघाताचा थरार! भरधाव बस अचानक उलटली, १६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT