MVA Seat Sharing  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Election: मविआचा सगळ्या जागांचा तिढा सुटला; पवार - ठाकरे - पटोले या दिवशी जागावाटप करणार जाहीर

Maharashtra Politics: महाविकास आघाडीचा सगळ्या जागांचा तिढा सुटला सुटला असून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या दिवशी जागावाटपाची माहिती जाहीर करणार.

Satish Kengar

सुनील काळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागावाटपाची आजची बैठक संपली आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सर्व जागांचा तिढा जवळपास सुटला आहे.

कधी होणार जागावाटप जाहीर?

याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितलं की, येत्या 11 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करणार आहेत. याचवेळी महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होऊ शकतं.

सुनील काळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

सूत्रांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, महाविकास आघाडीची नवरात्री सुरु झाल्यानंतर ही पहिलीच बैठक झाली. यानंतर आता मविआतील तिन्ही पक्षाचा प्रमुखांची पत्रकार परिषद 11 तारखेला होणार आहे. या पत्रकार परिषदेत हे तिन्ही नेते जागावाटप जाहीर करू शकतात. तसेच महायुती सरकारच्या कारभारावर टीका देखील करू शकतात.

सूत्रांनी सांगितलं की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. याचबाबतची घोषणा 11 तारखेला होऊ शकते.

याचबद्दल माहिती देताना शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत की, ''जागावाटपाच्या चर्चेचा आज दुसऱ्या टप्प्यातील दुसरा दिवस होता. उद्या अंतिम दिवस आहे. बहुतेक जागेवर निर्णय झाले आहेत. उद्या विदर्भाच्या काही जांगणावर चर्चा होणार आहे. विदर्भापासून उद्या सुरुवात होईल. 10-15 जागांवर चर्चा सुरू आहे. जे जिंकून येणार त्या पक्षाला जागा देणार आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT