Murlidhar Mohol cooperation Ministery:  Saamtv
मुंबई/पुणे

Murlidhar Mohol News: मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण खाते! पुणेकरांच्या आशा उंचावल्या; 'पुरंदरच्या आव्हाना'सह रखडलेल्या कामांना गती मिळणार

Gangappa Pujari

पुणे, ता. ११ जून २०२४

दोन दिवसांपूर्वी नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींच्या शपथविधीत राज्यमंत्री म्हणून पुण्याचे नवे खासदार मुरलीधर मोहोळ यांचीही वर्णी लागली. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री हे महत्वाचे खाते देण्यात आले आहे. पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर थेट केंद्रात लॉटरी लागल्याने मुरलीधर मोहोळ यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच रखडलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पुर्णत्वास नेण्याचे आवाहनही मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर आहे.

पुण्याला मंत्रीपदाची लॉटरी, मोहोळ यांच्यापुढे कोणते आव्हान?

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे सहकार आणि नागरी उड्डाण खाते देण्यात आले आहे. १९९५ नंतर प्रथमच पुण्याला केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाले. मोहोळ यांच्याकडे देण्यात आलेल्या या जबाबदारीमुळे लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार आणि पुरंदरमधील बहुप्रतिक्षित नवीन विमानतळ प्रकल्पासह अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल, अशी आशा आता पुणेकर व्यक्त करत आहेत.

पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या अपेक्षा

जागतिक दर्शाचे मोठे शहर असलेल्या पुण्यात केवळ २ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. त्यामुळे पुणे शहराला स्वतंत्र विमानतळाची गरज आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या नियुक्तीमुळे नवीन पुणे विमानतळ प्रकल्पाची जागा लवकरात लवकर निश्चित होईल आणि कामाला सुरुवात होईल. तसेच गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर आहे.

पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील दोन हजार ८३२ हेक्टर जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा २०१६ मध्ये करण्यात आली होती. मात्र गावकऱ्यांनी विरोध दर्शवल्यानंतर हा प्रश्न रखडला आहे, अशातच मोहोळ यांना मिळालेली मोठी जबाबदारी पाहता हे सर्व प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT