चोरी करण्यास विरोध केला अन् तिने जीव गमावला; पिंपरी-चिचंवड मधील धक्कादायक घटना! Saam Tv
मुंबई/पुणे

चोरी करण्यास विरोध केला,अन् तिने जीव गमावला; पिंपरी-चिचंवड मधील धक्कादायक घटना!

चोरट्यांना चोरी करण्यास विरोध केला म्हणून तिथे उपस्थित असणाऱ्या महिला वॉचमनचा खून.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड - पिंपरी – चिंचवड (Pimpri - Chinchwad) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. किवळे-रावेत येथील गोविंद बिल्डर (Govind Builder) यांच्या बांधकामाच्या साईट वरती चोरी करायला आलेल्या चोरांना चोरी करण्यास विरोध केला म्हणून तिथे उपस्थित असणाऱ्या महिला वॉचमनचा खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. (Murder of a female watchman)

हे देखील पहा-

सौंदव सोमेरू उराव असं खून झालेल्या महिला सुरक्षा रक्षकाच नाव आहे. सौंदव उराव ही आपला पती सोमेरू उराव सोबत गोविंद बिल्डर साईटवरती चौकीदार म्हणून कामाला होती. पश्चिम बंगाल मधील हे कुटुंब साईटवरती काम करत होते मात्र घटनेच्या दिवशी मृत महिलेचा पती दुसऱ्या साईटवरती कामाला होता त्यामुळे ती एकटीच या ठिकाणी होती. तसेच या महिलेच्या डोक्यात जबर मार लागला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर गेली. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या लिफ्टच्या खड्ड्यात मिळून आला. चोरट्यांनी बांधकाम साइटवरील तिच्या घरातील 30 हजार रुपये रोख रक्कम, 700 रुपयांची चांदीची चेन आणि सहा हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे झुबके असा ऐवज चोरून नेला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी खून केला असावा, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली. दरम्यान या सर्व प्रकरणाचा अधिकचा तपास करुन लवकरच आरोपीचा शोध घेऊ असं पोलिसांनी सांगितल आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT