crime update  saam tv
मुंबई/पुणे

Mumbra News: लैंगिक अत्याचार केला, १० व्या मजल्यावरून फेकलं; मुंब्रात १० वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह

Mumbra Crime News: मुंब्रामध्ये एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला आहे. अतिप्रसंग करून अल्पवयीन मुलीला इमारतीवरून फेकल्याचा आरोप होत आहे.

Bhagyashree Kamble

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रातून एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. मुंब्रामध्ये एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह इमारतीच्या डगमध्ये सापडल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला टेरेसवरून फेकून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे.

मुंब्राच्या ठाकुरपाडा परिसरातील श्रद्धा प्राप्ती या इमारतीच्या डगमध्ये एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न अवस्थेत असलेला मृतदेह सापडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, चिमुकलीला टेरेसवरून फेकण्यात आले असून, तिच्या कमरेखालच्या अंगावर कपडे नव्हते.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे इरफान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी पाणी येत नव्हते. तेव्हा गच्चीवरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून वाकून खाली पाहिले, तेव्हा एका चिमुरडीचा मृतदेह बिल्डींगच्या डगमध्ये पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तसेच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

या घटनेमागे नेमके कोण आहेत? या मुलीसोबत काही अत्याचार झाला होता का? याचा तपास पोलीस करीत आहेत. मृत मुलगी ठाकुरपाडा परिसरातीलच असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणातील कपिल दहिया आणि संजय कुमार शर्मा यांना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Kamali Serial: कमळीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; पण, कामिनी रचणार विषाचा कट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ८ दिवसात ₹१५०० जमा होणार? जूनच्या हप्त्याची अपडेट आली समोर

पुढील ७ दिवस राज्यात पावसाची "सुट्टी", मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात "नो अलर्ट"

Sperm count: स्पर्म काऊंट म्हणजे काय? तो किती असणं मानलं जातं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT