Borivali Saam
मुंबई/पुणे

Borivali: दारूची बाटली घेऊन आला, महिलेशी हुज्जत अन् पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न

Mumbai Police Arrest Drunk Man: दारूच्या नशेत आधी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली, नंतर थेट महिलेचं घर पेटवलं. या धक्कादायक घटनेनंतर बोरिवली हादरलं.

Bhagyashree Kamble

दारूच्या नशेत आधी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली, नंतर थेट महिलेचं घर पेटवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना मुंबईतील बोरिवलीमध्ये घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

लक्ष्मी प्रभाकर बोणताला (वय वर्ष ३४) असे महिलेचं नाव आहे. ती घरकाम करून आपले उदरनिर्वाह करत असते. लक्ष्मी या मुंबईच्या बोरिवली पश्चिमेतील गोराई भागात राहते. त्यावेळी लक्ष्मीच्या घरासमोर मद्यपी व्यक्ती आला. विशाल उदमले असे मद्यपी व्यक्तीचे नाव आहे. गल्लीमध्ये खुर्चीवर बसण्यावरून महिला आणि मद्यपी व्यक्तीमध्ये वाद झाला.

मद्यपी व्यक्तीने लक्ष्मीला शिवीगाळ केली. तसेच दगड घेऊन महिलेच्या अंगावर धावून गेला. नंतर महिलेने तेथून पळ काढला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात महिलेच्या घराच्या दारावर पेट्रोल ओतले. तसेच घर पेटवण्याचा प्रयत्न केला. यासह परिसरातील नागरिकांना धमकावले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेनंतर लक्ष्मीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. यासह आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात नवं राजकीय समिकरण, याठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र येणार? 'त्या' भेटीमुळे चर्चांना उधाण

Prostate Cancer Risk: सब्जाचं जास्त सेवन आरोग्यासाठी धोक्याचं; अ‍ॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत वाढतो धोका

Gold Rate Today : पुन्हा सोन्याचे दर घसरले, अचानक इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा ढोबळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

Gas Cleaning : 10 मिनिटांत गॅसवरील तेलकट डाग घालवा, वाचा हे सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT