Mumbai News update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : धक्कादायक! प्रसिद्ध हॉटेलकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; ऑनलाइन मागवलेल्या 'बटर चिकन'मध्ये आढळली माशी

Mumbai News update : प्रसिद्ध हॉटेलकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. या हॉटेलमधून ऑनलाइन मागवलेल्या 'बटर चिकन'मध्ये माशी आढळली आहे.

Vishal Gangurde

ऑनलाइन फूड ऑर्डर करणाऱ्यांनी घ्यावी खबरदारी

गोइला बटर चिकन मध्ये आढळली माशी

रेस्टॉरंटविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल

संजय गडदे, साम टीव्ही

ऑनलाइन फूड ऑर्डर करून जेवण घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील 'गोइला बटर चिकन (Goila Butter Chicken)’ या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून मागवलेल्या जेवणात माशी आढळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आणि अधिवक्ता निकिता एस. घाग यांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) केली आहे.

नेमकं काय घडलं?

निकिता घाग यांनी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी अंदाजे १.१४ वाजता गोइला बटर चिकनच्या अंधेरी येथील शाखेतून ‘डिलिव्हरी अॅप’द्वारे “देशी बटर चिकन” ऑर्डर केली होती. जेवण घेत असताना त्यांना जेवणात माशी आढळली. घाग यांनी तत्काळ हॉटेल कर्मचाऱ्यांना ही बाब कळवली. मात्र, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर तक्रारदाराने महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदाराच्या निवेदनानुसार, संबंधित रेस्टॉरंटने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करत अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS, 2023) मधील अनेक कलमांचे उल्लंघन केले आहे. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणारे कृत्य, बेफिकिरीने इजा अथवा मृत्यू होण्याची शक्यता निर्माण करणे आणि फसवणूक अशा अनेक मुद्द्यांचा या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

संबंधित जेवणाचे नमुने तपासून Testing Report प्रसिद्ध करावा. रेस्टॉरंटकडून दिलेल्या अन्नातील दूषितपणा तपासून त्यावर कारवाई करावी अशी मागणी आता तक्रारदाराने FDA प्रशासनाकडे केली आहे. दोष सिद्ध झाल्यास उत्पादक व विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी तक्रारदाराने केली.

या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने ऑनलाइन अन्न मागवणाऱ्या ग्राहकांना अत्यंत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. अन्नामध्ये दूषितपणा, वास, रंग किंवा अनैसर्गिक घटक आढळल्यास ग्राहकांनी तत्काळ संबंधित डिलिव्हरी अॅप आणि FDA हेल्पलाइनवर तक्रार दाखल करावी. ग्राहकांच्या आरोग्याशी थट्टा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Easy Hairstyles: कोणत्याही लूकवर करता येतील अशा 5 सोप्या हेअरस्टाईल्स

Mobile Use Eye Problems : मोबाईल जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Hadapsar Bullet Train: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! हडपसरला मिळणार बुलेट ट्रेन स्थानक; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update:शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक सुरु

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटला, मोठ्या प्रमाणात गॅसगळती, १६ तासांपासून महामार्ग ठप्प, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT