मुंबई/पुणे

Dahisar Pipeline Damage: मेट्रो कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

Mumbai Pipeline Damage: आज सकाळी मेट्रोचे काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली. यामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेले. वाहून गेलेले पाणी दहिसर भागातील सबवे परिसरात साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Dahisar News:

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील वेरावल्ली जलाशयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता दहिसर पूर्वेकडील टोलनाका परिसरात पश्चिम दृत्तगती महामार्गाजवळ महापालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याचे प्रकरण समोर आलं आहे. मेट्रोचे काम सुरू असल्याने या ठिकाणी पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

आज सकाळी मेट्रोचे (Metro) काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली. यामध्ये लाखो लिटर पाणी (Water) वाया गेले. वाहून गेलेले पाणी दहिसर भागातील सबवे परिसरात साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. परिसरात पाणी साचल्याने येथे काही प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. साचलेल्या पाण्यातून नागरिकांना कसरत करून वाट काढावी लागत आहे.

फुटलेल्या पाईपलाईनची दुरूस्ती करण्यासाठी जल अभियंता विभाग तेथे दाखल झाले आहे. तसेच दुरूस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. याआधी मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील वेरावल्ली जलाशयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली आहे. सदर घटनेत अथक प्रयत्नांनी ही जिलवाहिनी दुरूस्त करण्यात आली होती.

एकीकडे काही दुष्काळी भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागेतय. तर दुसरीकडे अशा पद्धतीने पाणी वाया जात आहे. यामुळे येथील काही नागरिकांनी पाईपलाईन फुटण्याच्या घटनांवर संतापही व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

राणेंनी कोकणात डाव टाकला! उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का; शेवटच्या तासात बाळ मानेंची माघार

Famous Producer Death : तेजस्वी तारा हरपला! ज्येष्ठ निर्मात्याचे निधन, मुंबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT