Mumbai Dam Water level Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

Mumbai Water Lake Level update : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलावांमधील पाणीसाठ्यात घट होत आहे. सध्या या ७ तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या २३ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा फक्त १७ टक्के पाणीसाठा उरला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईकरांची पाणी चिंता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. राज्यातील अनेक भागांत दिवसेदिवस उष्णतेचा पारा वाढू लागला आहे. याचदरम्यान, दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलावांमधील पाणीसाठ्यात घट होत आहे. सध्या या ७ तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या २३ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा फक्त १७ टक्के पाणीसाठा उरला आहे. यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट निर्माण झालं आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, तरीही पाणीकपातीचा मुंबई महापालिकेचा विचार नाही. परंतु मे अखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबई शहराला मध्य वैतरणा, विहार, मोडक सागर, तानसा, तुळसी, अप्पर वैतरणा आणि भातसा या सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. या ७ तलावांची पाणी साठवणीची क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. मुंबईकरांना या तलावांमधून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.

सध्या उष्णतेचा पारा खूप वाढला आहे. यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. तर दुसरीकडे तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळी कमी होत आहे.

मुंबईरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी अप्पर वैतरणा आणि भातसा या तलावांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव पाणीसाठा कायम असतो. या पाणीसाठ्याबाबतच्या निर्णयाचा अधिकार राज्य सरकारकडे असतो.

जलसाठ्यात मोठी घट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये २ लाख ५३ हजार ८९१ दशलक्ष लिटर (१७ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २३ टक्के पाणीसाठा होता. तर २०२२ मध्ये २६.४८ टक्के साठा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिल्लीत शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० हवेत? आजच करा eKYC; स्टेप बाय स्टेप करा फॉलो

Mumbai Crime : मुंबईत भर रस्त्यात महिलेची हत्या; नवऱ्याने चाकूने केले वार; सीसीटीव्ही Video व्हायरल

Holi 2026 Songs : अजून होळीची प्ले लिस्ट तयार नाही, आताच 'ही' टॉप १० गाणी Save करा अन् मनसोक्त नाचा

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! नवा मेट्रो मार्ग लवकरच होणार सुरू; कुठल्या भागातील वाहतूककोंडी फुटणार?

SCROLL FOR NEXT