mumbai virar jivdani devi temple accident news  Ai Image
मुंबई/पुणे

Accident News : देवीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला! विरारमध्ये टँकरच्या धडकेत माय लेकीचा मृत्यू

Mumbai Virar Jivdani Accident News : विरारच्या कोपरी नाका येथे टँकरच्या धडकेत आई आणि मुलीचा जागीच मृत्यू. देवीच्या दर्शनासाठी जात असताना भीषण अपघात.

Alisha Khedekar

  • विरारमध्ये भीषण अपघात

  • कोपरी नाका परिसरात टँकरने दुचाकीला धडक

  • टँकरच्या धडकेत आई मुलीचा मृत्यू

  • पोलीस तपास सुरु

मनोज तांबे, विरार

विरार येथील जीवदानी देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जात असलेल्या मायलेकींचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विरारमधील कोपरी नाका येथे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात कविता पाल (वय २९) आणि त्यांची चार वर्षांची मुलगी आरायू पाल यांचा मृत्यू झाला. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमक घडल काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कविता पाल या आपल्या चार वर्षांच्या मुलीसह वसईतील गावराई येथून दुचाकीवरून विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी जात होत्या. दरम्यान, सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास त्या विरारमधील कोपरी नाका परिसरात पोहोचल्या असता त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक दिली.धडकेची तीव्रता मोठी असल्याने मायलेकींचा मृत्यू झाला. नवरात्रीच्या उत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या मायलेकींवर काळाने घाला घातल्याने परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. अपघातासंदर्भातील पुढील माहिती पोलिसांच्या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच एकाच कुटुंबातील मायलेकींचा मृत्यू झाल्याने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दर्शनासाठी घरातून निघालेल्या कविता पाल आणि चिमुकल्या आरायू यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यावरील वाहतुकीदरम्यान वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अपघाताच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray : ठाकरे बंधूंवर गुन्हे दाखल; पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईत राजकीय वातावरण तापले

Onion And Garlic: नवरात्रीच्या उपवासाला कांदा- लसूण खावा की नाही? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या फटाका अग्नीकांडामध्ये पालिकेच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ; DA मध्ये थेट 'इतक्या' टक्क्यांची वाढ होणार

Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

SCROLL FOR NEXT