VIrar Saam
मुंबई/पुणे

Virar News: रामनवमीच्या रॅलीला गालबोट, अंडी फेकल्याचा आरोप; विरारमध्ये तणावाची स्थिती

Virar News egg pelting on Ram navami rally: विरारमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रामनवमीनिमित्त रॅली काढण्यात आली होती, या रॅलीवर काही अज्ञात लोकांनी अंडी फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Bhagyashree Kamble

वसई विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. रामनवमीनिमित्त रॅली काढण्यात आली होती, या रॅलीवर काही अज्ञात समाजकंटकांनी अंडी फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर काही काळ विरारमधील त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थीती नियंत्रणात आणली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरारच्या एकता पार्क्स विले इमारतीजवळ राम नवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेची सुरूवात विरारच्या चिखल डोंगरी येथून करण्यात आल्याची माहिती आहे. या शोभा यात्रेचे आयोजन सखल हिंदू समाजाद्वारे करण्यात आली होती. या यात्रेत हजारोच्या संख्येने भाविक मग्न होत रॅलीमध्ये सहभाग झाले होते.

मात्र, या शोभा यात्रेमध्ये एक आक्रित प्रकार घडला. काही अज्ञात लोकांनी रॅलीवर अंडी फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. काही अज्ञात व्यक्तींनी अंडी फेकल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी यात्रेदरम्यान रोष व्यक्त केल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच संबंधित तरुणाला बोळींज पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी या घटनेचा निषेध करत रोष व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT