MYSTERY DEEPENS IN SATHAYE COLLEGE STUDENT'S DEATH AT VILE PARLE Saam TV News
मुंबई/पुणे

Sathaye College: साठ्ये कॉलेजमध्ये तरूणीनं आयुष्य संपवलं; पोलिसांच्या हाती CCTV फुटेज, आत्महत्या की घातपात?

Sathaye College Student Ends her life: विले पार्ले येथील नामांकित साठ्ये कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत २१ वर्षीय विद्यार्थिनी संध्या पाठक हिने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईच्या विले पार्ले भागातील साठ्ये कॉलेजमधून हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं. तिनं इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या केली आहे. या प्रकरणानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र,तिच्या पालकांनी मृत्यूबाबत वेगळाच संशय व्यक्त केला आहे. तरूणीला कुणीतरी धक्का मारल्याचा संशय व्यक्त केला आहे. साठ्ये कॉलेजनं मात्र, ही आत्महत्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.

संध्या पाठक (वय वर्ष २१) असे मृत तरूणीचे नाव आहे. विले पार्ले स्थित साठ्ये कॉलेजमध्ये थर्ड इअरची ती विद्यार्थिनी होती. तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवलं. विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यानंतर कॉलेज प्रशासनाने यासंदर्भातील माहिती कुटुंबाला दिली. कुटुंब तातडीने कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांनी या घटनेनंतर एक वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

'आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही', असं म्हणत मृत तरूणीच्या कुटुंबाने संशय व्यक्त केला आहे. तरूणीला नेमकं कुणी ढकललं? यांसारखे प्रश्न मृत तरूणीच्या कुटुंबाने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी साठ्ये महाविद्यालयात धाव घेतली, तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिसऱ्या मजल्यावर तरूणी कॉरिडरमध्ये चालत असताना दिसून येत आहे.

तरूणीनं आत्महत्या केल्यानंतर तिला तातडीने जवळच्या रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सध्या संध्याने टोकाचं पाऊल का उचललं? तिने आत्महत्या केली की घातपात? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. दरम्यान, पोलीस तापासातून काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल

Mira Bhayandar: सोन्याहून महाग कचऱ्याचा डबा, एकाची किंमत ७० हजार रुपये; अंजली दमानियांनी मिरा-भाईंदर पालिकेला घेरलं|VIDEO

Jayant Patil: '..त्यांनी महायुतीत यावं, मी मध्यस्थी करायला तयार'; केंद्रीय मंत्र्याची जयंत पाटलांना मोठी ऑफर

Mehak Pari Arrested : रीलमध्ये शिव्यांची लाखोली, अश्लिलतेचा कळस; सोशल मीडिया स्टार महक-परीवर अटकेची कारवाई

Multibagger Stock : ५० रुपयांच्या शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या ३ वर्षांत लाखाचे झाले 1,900,000 रुपये

SCROLL FOR NEXT