Mumbai  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत रिक्षाने फिरून घर हेरायचे, तिघांची टोळी लुटायची लाखोंचा ऐवज; असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Crime News : मुंबईत रिक्षाने फिरून घरफोडी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Vishal Gangurde

मुंबईत रात्रभर फिरून घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांकडून ३ आरोपींना अटक

टोळीकडून ५ गुन्ह्यांचा उलगडा

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईत रिक्षामधून फिरत रात्रीच्या वेळी घरफोडी आणि चोरी करणाऱ्या टोळीचा वनराई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीतील तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन रिक्षा आणि चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकूण ५ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

प्रतीक नितीन मेहता (वय ३७) यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी हे रिक्षामधून चोरी करत असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बांद्रा पश्चिम परिसरातून मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ३ रिक्षा, चिनी, कटावणी, ७ इंचाचा चाकू, लोखंडी रॉड असे साहित्य जप्त केले.

सचिन अशोक गवस (४३), योगेश ईश्वर राठोड (१९), तोफिक नौशाद खान (४३)अशी गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी यापूर्वी देखील असे अनेक गुन्हे केले होते. मुंबईच्या वनराई, बोरिवली, गोरेगाव, अंधेरी अशा अनेक पोलिस ठाण्यात यांच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत.

ही कारवाई उप पोलीस आयुक्त महेश चिमटे, सहायक पोलीस आयुक्त विजय भिसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कार्यवाहीचे नेतृत्व पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र पोस्टुरे,(गुन्हे),पो. उ.नि इंद्रजीत भिसे, पो. उ. नि संग्राम गावडे, पो. ह. मिसाळ, पो. ह. राणे, पो.शि.नवलू यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे परिसरातील घरफोड्या आणि रिक्षा चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT