Mumbai Underground Metro Service Disruption google
मुंबई/पुणे

Mumbai Metro 3 AquaLine: मोठी बातमी! मुंबई मेट्रो 3 मध्ये बिघाड, तासभरापासून मुंबईकरांचा खोळंबा, नेमकं काय घडलं?

Mumbai Underground Metro Service Disruption : मुंबई मेट्रो ३ च्या अॅक्वा लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जवळपास एक तास सेवा ठप्प करण्यात आली. सकाळच्या गर्दीत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Sakshi Sunil Jadhav

मुंबईतल्या महत्वाच्या भुयारी मेट्रोने आज नागरिकांचा खोळंबा केला. 'अॅक्वा लाईन'च्या सेवेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज सकाळी अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कफ परेडच्या दिशेने जाणारी एक मेट्रो ट्रेन मार्गातच थांबवल्यामुळे संपूर्ण मार्गातल्या सेवा जवळपास १ तासासाठी विस्कळीत झाल्या. सकाळच्या गर्दीच्या आणि कामाच्या वेळेमध्ये ही घटना घडली.

मुंबई मेट्रो ३ ही शहरातली प्रमुख व्यावसायिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणारी महत्त्वाची भूमिगत वाहतूक व्यवस्था मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससोबत अनेक स्टेशनवर प्रवाशांना मेट्रोची बराच वेळ वाट पाहावी लागली. सेवा बंद असल्याचं सुरूवातीला नागरिकांना सांगण्यात आलं नाही. तसेच कोणत्याही प्रकारची माहितीही देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. महत्वाचं म्हणजे यावेळेस काही स्थानकांवरचे प्रवेशद्वार तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. कारण जास्तीची गर्दी होऊ नये. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना स्थानकाबाहेरच थांबावं लागलं.

स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मेट्रो ट्रेन दोन स्थानकांच्या दरम्यान अडकून राहिली होती. त्यात काही तांत्रिक अडचणीमुळे ती पुढे सरकू शकत नव्हती. त्यामुळे संपूर्ण मार्गावरील वाहतूकी थांबवण्यात आल्या. तिथे दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं. तर पुढे सेवा पुन्हा सुरू होण्यासाठी जवळपास एक तास लागू शकतो, अशी माहिती प्रवाशांना देण्यात नंतर देण्यात आली.

अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. सेवा बंद असतानाही अधिकृत घोषणा न झाल्याबद्दल तसेच वेळेवर माहिती न दिल्याबद्दल प्रवाशांनी प्रश्न विचारले. त्यात काहींनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मेट्रो प्रशासनावर टीका केल्या.

प्रवाशांसाठी काहीतासांनी मुंबई मेट्रो प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. त्यामध्ये तांत्रिक कारणांमुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील सेवा थांबवण्यात आल्या होत्या. मात्र त्यातील बिघाड दुरुस्त करण्यात आलेला आहे. आता सर्व मेट्रो सेवा सुरळीतपणे सुरु करण्यात आल्या आहेत. असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT