mumbai local  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईत एकाच ट्रॅकवर २ लोकल ट्रेन समोरासमोर आल्या अन्...; हा व्हिडिओ बघून म्हणाल, अरे बापरे!

Mumbai train mishap video : मुंबईत २ लोकल ट्रेन समोरासमोर एकाच ट्रॅकवर आल्याची घटना घडली. मात्र, थोडक्यात पश्चिम रेल्वेवरील मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकारानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनबाबत मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईत दोन लोकल ट्रेन एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याची घटना घडली. दोन्ही लोकल ट्रेन अचानक समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. पश्चिम रेल्वेच्या मिरा रोड स्टेशनवर सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा दिवसभरात लोकल ट्रेनने प्रवास होतो. नोकरीवर पोहोचण्यासाठी नागरिकांचं पहिलं प्राधान्य लोकल ट्रेनला असतं. याच लोकल ट्रेनला प्रवाशांची मोठी गर्दी असते. लोकल प्रवासी प्रचंड गर्दीतून नोकरीसाठी कार्यालय गाठतात. ऑफिसला जाताना प्रवासी निश्चिंत असतात. त्यांना अपघाताची कोणतीही भीती नसते. मात्र, आज बुधवारी लोकल ट्रेनचा मोठा अपघात थोडक्यात टळला. हा प्रकार समजताच अनेक प्रवाशांची झोप उडाली.

नेमकं काय घडलं?

पश्चिम रेल्वेच्या मिरा रोड स्टेशनजवळ मोठी घटना घडली. मिरा रोड रेल्वे स्टेशनवर एकाच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरासमोर आल्याची घटना घडली. दादरकडून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मिरा रोड रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन्ही ट्रेन आल्या. दोन्ही लोकल ट्रेन समोरासमोर येऊ लागल्याने स्टेशनवर उभे असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. लोकल ट्रेनच्या मोटनमनच्या सतर्कतेमुळे काही मीटर अंतरावर दोन्ही ट्रेन थांबवण्यात आल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अन् रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत

मिरारोड रेल्वे स्टेशनजवळ दोन लोकल ट्रेन समोरासमोर आल्याने सेवा विस्कळीत झाली होती. मात्र, काही वेळेने मिरारोड आणि भाईंदर रेल्वे सेवा सुरळीत झाली. सिग्नल बिघाड झाल्याने ही घटना घडल्याची समोर आलं आहे. सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडली आहे. दोन्ही लोकल ट्रेन १० मिनिटे समोरासमोर उभ्या होत्या. या प्रकारानंतर प्रवासी घाबरून रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि पायी चालू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

कर्जत-पनवेल प्रवास फास्ट होणार; गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले; भाजप उधळपट्टी करत असल्याची टीका

SCROLL FOR NEXT