Mumbai TRain News Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai News: चाकरमान्यांना मनस्ताप! पळसदरी स्टेशन जवळ क्रॉसिंग पॉईंट फेल; पुणे-मुंबई वाहतूक खोळंबली

लोणावळा (Lonavla) ते कर्जतमधील क्रॉसिंग पॉइंट फेल झाल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, प्रतिनिधी...

Mumbai Train Issue: पळसदरी स्टेशनच्या अलीकडील पॉईंट फेल झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे इतर ट्रेनला याचा मोठा फटका बसला असून गेल्या तासाभरापासून वाहतूक खोळंबली आहे. या प्रकारामुळे मुंबईच्या चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणावळा (Lonavla) ते कर्जतमधील क्रॉसिंग पॉइंट फेल झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सिंहगड एक्स्प्रेसह अनेक ट्रेनना याचा फटका बसला आहे. पळसदरी स्थानकाच्या अलीकडील पॉइंट फेल झाला आहे. यामुळे गेल्या तासभराहून अधिक काळ वाहतूक खोळंबलेली आहे.

लोणावळा ते कर्जतच्यामध्ये असलेल्या पळसदरी स्टेशनजवळ एका क्रॉसिंग पॉइंटमध्ये बिघाड झाला. यामुळे पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. यावेळी सिंहगड एक्सप्रेस कर्जत स्थानकाच्या अलीकडे सुमारे दीड तास थांबली होती. त्यामुळे त्यामागून येणाऱ्या सर्व रेल्वेंनाही विलंब झाला.

दरम्यान, सकाळी ट्रेनने पुण्याहून (Pune) मुंबईकडे अनेक चाकरमानी येत असतात. हजारो प्रवासी कामानिमित्त ट्रेनने प्रवास करत असतात .मात्र सकाळी- सकाळी ट्रेनचा घोळ झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. ज्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT