Maharashtra Government Oath-Taking Ceremony:  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Traffic: नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, या पर्यायी मार्गाचा करा वापर

Maharashtra Government Oath-Taking Ceremony: भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आझाद मैदानावर उद्या सायंकाळी ५.३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १३ व्या दिवशी सरकार स्थापन होणार आहे. सध्या राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. ५ डिसेंबरला म्हणजे उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची सध्या आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचसोबत या सोहळ्यासाठी वाहतुकीमध्ये बदल देखील करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आझाद मैदानावर उद्या सायंकाळी ५.३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीचा नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे.

महापालिका मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकदरम्यान उद्या वाहतूक बंद असणार आहे. क. हजारीमल सोमानी मार्ग: चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोड दरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद राहणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीचे नियमन लागू राहणार आहे.

या काळामध्ये नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. शपथविधी सोहळ्याला येणाऱ्यांना पार्किंगबाबत महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आझाद मैदानात पार्किंगची व्यवस्था नसल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT