Eastern Freeway Extension, Mumbai Thane  
मुंबई/पुणे

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! मुंबई ते ठाणे प्रवास अवघ्या २५ मिनिटांत; MMRDA चा मोठा निर्णय

Mumbai-Thane Traffic Relief: मुंबई-ठाणे प्रवासासाठी मोठी अपडेट! MMRDAच्या १३.९ किमी ईस्टर्न फ्रीवे एक्सटेंशनचे काम वेगाने सुरू असून भांडुपजवळ पहिला ९० टनांचा सेगमेंट बसवण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Eastern Freeway Extension, Mumbai Thane : मुंबई आणि ठाण्यादरम्यान होणारी दररोजची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीए (MMRDA) कडून १३.९ किलोमीटर लांबीच्या 'ईस्टर्न फ्रीवे एक्सटेंशन' (उन्नत मार्ग) चे काम वेगाने सुरू आहे. भांडुप पंपिंग स्टेशनजवळ या रस्त्याचा पहिला ९० टनांचा महाकाय सेगमेंट (प्रीकास्ट ब्लॉक) यशस्वीपणे बसवण्यात आला आहे. सर्वात विशेष म्हणजे खाली ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असताना वर हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

खाली वाहतूक सुरू, वर पुलाचे काम!

हा ६-पदरी उन्नत मार्ग थेट पूर्व मुक्त मार्गाच्या (ईस्टर्न फ्रीवे) विस्ताराचा भाग आहे. व्यस्त ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर खाली वाहनांची ये-जा सुरू असतानाच, आधुनिक 'लाँचिंग गॅन्ट्री' तंत्रज्ञानाचा वापर करून हवेतच हा सेगमेंट बसवण्यात आला. यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा न आणता काम पूर्ण करणे शक्य झाले आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:

घाटकोपरमधील छेडा नगर ते ठाण्यातील आनंद नगर असा मार्ग असेल. १३.९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा मंजूर कंत्राट खर्च सुमारे ₹२,६८२ कोटी आहे. या संपूर्ण उन्नत मार्गात ४० मीटरचे एकूण २८८ स्पॅन उभारले जाणार आहेत. संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल ३,७३२ प्रीकास्ट सेगमेंट वापरले जातील.

या मार्गावर मुलूंड, ऐरोली, जेव्हीएलआर (JVLR), कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर या प्रमुख ठिकाणांना जोडणारे रॅम्प आणि लूप असतील.

प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होणार

सध्या दक्षिण मुंबईतून ठाण्याकडे जाताना किंवा ठाण्यातून मुंबईत येताना घाटकोपर, कांजूरमार्ग आणि मुलुंड परिसरात मोठा ट्रॅफिक जॅम होतो. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई आणि ठाण्यादरम्यानचा प्रवासाचा वेळ तब्बल २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Crisis : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! ६ ऑक्टोबरपासून ३६ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या २ मोठ्या मागण्या, थेट सरकारलाच केलं चॅलेज

Rajma Vs Chole : राजमा की छोले? प्रोटीनसाठी कोण ठरतंय भारी? उत्तर जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Abhijeet Dipke : अभिजित दीपकेंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजी पार्क परिसरातील आंदोलन भोवणारं

Maharashtra News Live Update: वर्धामधील आर्वी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT