Bandra Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Bandra Crime News: रिकाम्या ट्रेनच्या कोचमध्ये एकटीच झोपलेली, हमालाने गैरफायदा घेत नको ते केलं; मुंबई हादरली

Crime against women in Mumbai: मुंबईतील वांद्रे टर्मिनस परिसरात एका महिलेवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी हमालाला अटक करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईतील वांद्रे टर्मिनस परिसरात एका महिलेवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. रिकाम्या ट्रेनच्या कोचमध्ये ५५ वर्षीय महिला एकटीच झोपली होती. हमालाने गैरफायदा घेत महिलेवर लैंगिक अत्याचार केला. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हमालाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

वांद्रे टर्मिनस या ठिकाणी एका ५५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. ही भयंकर घटना शनिवारी घडली आहे. ५५ वर्षीय महिला ट्रेननं हरिद्वार या ठिकाणाहून मुंबईत आली होती. शनिवारी रात्री तिची ट्रेन वांद्रे टर्मिनस या ठिकाणी पोहचली होती. ही महिला रिकाम्या ट्रेनच्या कोचमध्ये एकटीच झोपली होती.

रिकाम्या ट्रेनच्या कोचमध्ये एकटी झोपली असल्याचा फायदा घेत हमालाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि हमाला विरोधात तक्रार दाखल केली. रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

रेल्वे पोलिसांनी वांद्रे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला शोधलं आणि हमालाला अटक केली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT