mumbai Shocking  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

mumbai Shocking News : मुंबईत ४५ वर्षीय व्यक्तीने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं आहे.

Vishal Gangurde

मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात घडली धक्कादायक घटना

४५ वर्षीय व्यक्तीने आयुष्य संपवलं, परिसरात खळबळ

कांदिवलीतील समता नगर पोलिसांकडून तपास सुरू

संजय गडदे, साम टीव्ही

देशासहित मुंबईत आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. मुंबईत सोमवारी ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कांदिवली पूर्व पोईसर भागातील या व्यक्तीने आयुष्य संपवलं आहे. या व्यक्तीने आयुष्य संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या कांदिवली पूर्वेती पोईसर भागात ४५ वर्षीय व्यक्तीने स्वतःचा बंदुकीने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाकर चंद्रशेखर ओझा असे ४५ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. प्रभाकर यांनी स्वतःच्या परवाना असलेल्या बंदुकीने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली.

आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रभाकर ओझा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शताब्दी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. या गोळीबार झाल्याच्या घटनांमुळे कांदिवली पोईसर भागामध्ये भीतीचा वातावरण पसरलं आहे. प्रभाकर यांनी टोकाचं पाऊल का उचललं, त्यांचा गोळीबार करण्या मागचा उद्देश काय होता, यासंदर्भात समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे.

सहावीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

लातूरच्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का किरण पाटोळे हिचा वसतिगृहात मृत्यू झाल्याच्या घटनेने वातावरण चांगलंच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी अनुष्काचा मृतदेह वस्तीगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिस अधिकचा तपास करत आहेत. मात्र कुटुंबीयांकडून घातपात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी लातूर शहरातल्या गांधी चौकात आज कुटुंबियांकडून रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून तातडीने प्रयत्न करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांठी महत्वाची बातमी! बोपदेव घाट आजपासून ७ दिवसांसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

मुंबईच्या विकासाची सुरूवात नागपूरकरामुळे, देवेंद्र फडणवीस यांनी मांडला हिशोब, वाचा राज ठाकरेंना काय दिले उत्तर

Clothes Cleaning Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याच्या या 5 स्मार्ट टिप्स तुम्हाला माहितीयेत का?

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

Crime News : भयंकर! आईचं काकासोबत लफडं, मुलाने दोघांना एकत्र पाहिलं; वडिलांना सांगण्याआधीच त्याला संपवलं

SCROLL FOR NEXT